Author: लोक संवाद न्यूज मराठी
-

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रगत रेशीम शेतकरी महागावे यांचा सन्मान.
नांदेड, : जिल्हा रेशीम कार्यालय, नांदेड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील प्रगत रेशीम उत्पादक शेतकरी रामचंद्र दिगंबर महागावे रा. सांगवी, ता. नायगाव, जि. नांदेड यांचा जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महागावे यांनी पारंपरिक शेतीसोबत रेशीम शेतीमध्ये तुती कोष उत्पादन करून एका वर्षात ₹३,७९,६५६ इतके उत्पन्न मिळवत इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श…
-

यगाव शहरात चोरट्याचा धुमाकुळ; ! पोलिस स्थानका जवळच पाच दुकाने फोडली; नायगाव हादरले, व्यापाऱ्यांत प्रचंड संताप.
नायगाव : बाळासाहेब पांडे फोटो नायगाव शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत पोलीस यंत्रणेलाच खुले आव्हान दिल्याचे चित्र समोर आले आहे. पोलीस ठाण्याच्या जवळच अंतरावर असलेल्या तब्बल पाच दुकानांचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी शनिवार रविवार च्या मध्य रात्रीहात साफ केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. भरवस्तीत, मध्यवर्ती भागात आणि पोलीस ठाण्याच्या अत्यंत जवळच ही चोरीची…
-

मतदार यादी पुनरीक्षणाला सुरुवात; प्रत्येक पात्र मतदाराने नावाची खात्री करावी — श्रावण पाटील भिलवंडे यांचेआवाहन.
नायगाव भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (SIR) – २०२६ मोहिमेला प्रारंभ झाला असून, प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूक राहावे, नव्या मतदारांची नोंद वेळेत व्हावी तसेच आवश्यक दुरुस्त्या मुदतीत पूर्ण व्हाव्यात, यासाठी नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे यांनी केले आहे. मतदार यादीतील…
-

श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे दहावे वर्ष; ७ जुलैपासून आळंदी ते पंढरपूर पायी वारीला प्रारंभ.
श्री महारुद्र रोकडेश्वर महाराज दिंडी आपादी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे यंदा दहावे वर्ष साजरे होत आहे. यानिमित्त दिंडीचे प्रस्थान मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता होणार असून, आळंदी ते पंढरपूर हा पारंपरिक पायी वारीचा प्रवास मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. यंदाच्या वारीचा मार्ग राटोळी–नायगाव–औंढा नागनाथ–परभणी–गंगाखेड–पुणतांबा–श्रीक्षेत्र…
-

माऊलींच्या नामघोषात नरसीची दिंडी २ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान ; सद्गुरू गुंडा महाराज देगलूरकर यांच्या कृपाशीर्वादाने आळंदी ते पंढरपूर पायी वारी; भक्तांना सहभागी होण्याचे आवाहन.
नायगाव : बाळासाहेब पांडे वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा जपत नरसी येथील श्रीराम मंदिर देवस्थानाच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासमवेत निघणाऱ्या पारंपरिक पायी दिंडीचे प्रस्थान गुरुवार, २ जुलै २०२६ रोजी होणार आहे. परमपूज्य सद्गुरू गुंडा (चंद्रशेखर) महाराज देगलूरकर यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित या दिंडी सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, वारकरी आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण…
-

एनडीसीसी बँक निवडणूक : ‘ब’ प्रक्रिया व पणन मतदारसंघातून श्रावण पाटील भिलवंडे नरसीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
नायगाव : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी (एनडीसीसी) बँकेच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून, ‘ब’ प्रक्रिया व पणन मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे नरसीकर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे निर्माण झाली असून, सहकार आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले…
-

पत्रकारांना धमकी दिल्या प्रकारांनी खासदार संजय दिना पाटील त्यांच्याविरुद्ध कारवाई करा – मराठी पत्रकार परिषदेचे तहसीलदारांना निवेदन.
माहुर : माहूर : पत्रकारांशी कथित शिवीगाळ, धमकी व अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप करत खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषद, तालुका शाखा माहूरच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी (दि. २९) तहसीलदार, माहूर यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांशी अशा…
-

मंदिर प्रशासनातील पारदर्शकतेची गरज अधोरेखित; चंपत राय प्रकरणानंतर चर्चेला उधाण.
माहुर: जयकुमार आडकिने माहूर – अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या राजीनाम्याच्या चर्चेमुळे देशभरातील धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मंदिरांचे प्रशासन, देणग्यांचे व्यवस्थापन, विकासकामे आणि पारदर्शकता यांसारख्या मुद्द्यांवर आता अधिक गांभीर्याने विचार होण्याची गरज निर्माण झाली आहे. देशातील अनेक मोठ्या मंदिरांचे व्यवस्थापन ट्रस्ट, धर्मादाय संस्था किंवा सार्वजनिक न्यासांमार्फत…
-

ब्रेकडाऊनच्या नावाखाली कुंटूर 33 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित.
कुंटूर : महावितरणकडून ब्रेकडाऊन व इमर्जन्सी लोडशेडिंगचे कारण देत कुंटूर 33 केव्ही उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे कुंटूरसह परिसरातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा बंद असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. महावितरणच्या अधिकृत संदेशानुसार, “इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू असून वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. मुख्य कार्यालयाकडून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत कोणतीही निश्चित वेळ…
-

कुंटूर येथे ‘आनंद क्लिनिक’चे उद्घाटन; अनुभवी डॉक्टरांकडून दर्जेदार आरोग्यसेवा.
कुंटूर कुंटूर : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कुंटूर मध्ये’आनंद क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकमध्ये बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, केसविकार, पोटाचे आजारांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. क्लिनिकमध्ये डॉ. अनिकेत गणेशराव कल्याण (BAMS) हे पोटाचे आजार, बालरोग व जनरल फिजिशियन म्हणून सेवा देणार असून, डॉ. मनिषाताई अनिकेत…