Category: नायगाव
-

देगाव शिवारात साई पेट्रोलपंपाजवळ निळकंठेश्वर ट्रॅव्हल्सने दोन मोटारसायकल स्वाराला फरपटत नेले;दोघेही मृत्यूशी झुंज देताहेत.
नायगाव नायगाव शहरालगत देगाव शिवारातील साई पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास काळाने घाला घातला. भरधाव वेगाने देगलूर-नांदेड धावणाऱ्या निळकंठेश्वर खाजगी ट्रॅव्हल्सने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांना ट्रॅव्हल्सने जवळपास 100 मीटर फरफटत घासत नेले या भीषण अपघातात देगाव येथील पप्पू बालाजी विभुते, वय 45 असुन माधव चिंचलवाड,…
-

कोलंबी जलउपसा सिंचन प्रकल्पात भ्रष्टाचाराचा ‘पूर’ ; निकृष्ट कामांमुळे शेतकरी संतप्त;नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा १ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा.
नायगाव :बाळासाहेब पांडे कोलंबी जलउपसा सिंचन प्रकल्पातील निकृष्ट व अपुऱ्या कामांविरोधात परिसरातील शेतकऱ्यांचा संताप अखेर उफाळून आला असून, प्रकल्पातील त्रुटी तात्काळ दूर करून कामे पूर्ण न झाल्यास येत्या १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या या प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च…
-

साईनाथ महाराजांनी घेतलेला वसा जगाला प्रेरणा देईल : श्री देवदेवेश्वर संस्थानचे महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांचे प्रतिपादन.
जयकुमार अडकिने : श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे अधिक मास (धोंडे पुरुषोत्तम मास) निमित्त दि. 17 मेपासून सुरू असलेल्या भव्य चुलबंद धोंडे जेवण महाअन्नदान कार्यक्रमास भगवान श्री दत्तप्रभूंचे निद्रास्थान असलेल्या श्री देवदेवेश्वर संस्थानचे महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर…
-

नायगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी सतीश लोकमनवार, गणेश नायगावकर बिनविरोध.
नायगाव : बाळासाहेब पांडे शहराच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून नायगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी सतीश लोकमनवार आणि गणेश नायगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नगरपंचायतीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. नगरपंचायतीच्या सभागृहात स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन शुक्रवार २२ मे रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले होते. या…
-

गॅस वितरणाच्या संतापातून नायगावात चक्काजाम ; रिकाम्या टाक्या रस्त्यावर फेकून नागरिकांचे आंदोलन; नांदेड-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प.
नायगाव : नायगाव शहरातील डॉ. हेडगेवार चौक येथे गॅस वितरणातील विलंबामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज सकाळी अचानक चक्काजाम आंदोलन छेडल्याने नांदेड-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णतः विस्कळीत झाली. रिकाम्या गॅस टाक्या थेट रस्त्यावर टाकून नागरिकांनी रास्ता रोको केल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आज सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन…
-

हुस्सा येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन सुरू.
आडकिने शंकर पाटील हुस्सा परिसरातील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नदी पात्रात तराफा व पाईपच्या साहाय्याने दोन ठिकाणी रेती उपसा केला जात आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या या उत्खननामुळे नदीच्या नैसर्गिक…
-

मौत का कुआं’ ठरलेल्या हेडगेवार चौकातील खड्डे बुजवण्यास पुन्हा वेग; तांत्रिक अडचणी नंतर पाच दिवसांच्या खंडानंतर कामाला नव्याने गती
नायगाव : बाळासाहेब पांडे नांदेड–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नायगाव शहरातील अतिवर्दळीचा डॉ. हेडगेवार चौक गेल्या काही महिन्यांपासून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरत होता. या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, काही तांत्रिक अडचणींमुळे तब्बल पाच दिवस बंद पडलेले खड्डे बुजवण्याचे काम अखेर पुन्हा एकदा मोरे यांना शब्द दिल्या प्रमाणे १५…
-

कष्टकरी कुटुंबियांच्या मुलाने PSI पद गाठले!
नायगाव : बाळासाहेब पांडे नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथील जिद्दी युवक ज्ञानेश्वर शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे आंतरगावसह संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत…
-

पंचायत राज दिनानिमित्त नरसी येथे बुद्धविहार सुशोभीकरण कामाचा शुभारंभ; महिलांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ.
नायगाव : नायगाव पंचायत राज दिनाच्या औचित्य साधून नरसी शहरात विकासकामांना गती देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. शहरातील बुद्धविहार येथे सुशोभीकरण कामाचा प्रारंभ कष्टकरी महिलांच्या शुभहस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे सामाजिक व धार्मिक स्थळाचे सौंदर्य वाढण्यासोबतच परिसराच्या एकूण विकासाला चालना मिळणार आहे. लोकप्रिय युवानेते खासदार रविंद्र पाटील चव्हाण यांच्या विकास निधीतून हे काम…
-

उत्सव संतांचा, कुंभमेळा वारकऱ्यांचा उपक्रम यशस्वीतेसाठी २६ एप्रिल रोजी नांदेडला बैठक.
नांदेड : बाळासाहेब पांडे उत्सव संताचा कुंभमेळा वारकऱ्यांचा हा उपक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला असून भव्य दिव्य कीर्तन महोत्सव, ११,००० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संतचरित्र कथा या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी २६ एप्रिल रोजी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. हा उत्सव ऐतिहासिक होण्यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात येणार असून सर्वांना सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सदरील…