Category: नायगाव
-

नायगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अमोल भगत रुजू.
नायगाव : बाळासाहेब पांडे नायगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अमोल भगत यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांच्या रुजू झाल्यानंतर व्हॉईस ऑफ मिडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने नायगाव शहरासमोरील विविध समस्या आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यापूर्वी पोलीस निरीक्षक अमोल भगत हे हिमायतनगर पोलीस ठाण्यात…
-

सोयाबीन बियाणे वाटपास प्रारंभ; शेतकऱ्यांना पेरणीबाबत कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी देवरे यांचे आवाहन.
शंकर पाटील अडकिने नायगाव तालुक्यात सोयाबीन बियाण्यासाठी एकूण 5,700 शेतकऱ्यांनी अर्ज केले असून, “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वानुसार 1,274 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या या शेतकऱ्यांना एकूण 669 क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता आहे. सदर बियाण्याचा पुरवठा महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आजपर्यंत एकूण 360 क्विंटल बियाण्याचा पुरवठा…
-
नायगावचे तालुका कृषी अधिकारी दीपेश देवरे यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून सेवेतून बंडथर्फ करा: विक्रम पाटील .
नायगाव तालुक्यातील कृषी अधिकारी हे कार्यालयात आठ दिवसाला एक वेळेस येऊन निघून जातात पण या ठिकाणी नायगाव तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यातील शेतकरी शासनाच्या विविध योजनेसाठी कृषी कार्यालयात वारंवार चकरा मारत आहेत पण अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची अरेरावेची भाषा वाढली आहे. नायगाव तालुक्याचे प्रमुख असलेले तालुका कृषी अधिकाऱ्याचा कर्मचाऱ्यावर वाचक नसल्याने अनेक कर्मचारी कामाच्या वेळेत…
-

शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी नियोजनबद्ध कार्यकर्माची आखणी करा : गटशिक्षणाधिकारी दर्शनवाड यांचे आवाहन ; शाळा प्रवेशोत्सव, युडायस माहिती अद्ययावत करणे व शैक्षणिक गुणवत्तेवर आढावा बैठकीत भर.
नायगाव : बाळासाहेब पांडे “शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच शाळांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांनी नियोजनबद्ध कार्यक्रमांची आखणी करावी,” असे आवाहन नायगाव पंचायत समितीचे नूतन गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड यांनी केले. आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद कन्या शाळेच्या सभागृहात बुधवारी सकाळी अकरा वाजता ही बैठक पार…
-

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात कोलंबी ग्रामपंचायतीचा झेंडा; तालुक्यात प्रथम क्रमांक.
नायगाव : बाळासाहेब पांडे फोटो मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नायगाव तालुक्यातील कोलंबी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत विकासकामांच्या माध्यमातून आपला ठसा उमटविला आहे. ग्रामविकास, स्वच्छता, लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर कोलंबी ग्रामपंचायतीने हा मान मिळविला आहे. राज्य शासनाच्या वतीने दि. 17 सप्टेंबर 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध…
-

वादळाचा तडाखा : लालवंडीतील शेतकऱ्याचे सोलार यंत्रणेचे मोठे नुकसान ; नायगाव तालुक्यातील अनेक गावांत घरांचे, शेतीचे व फळबागांचे नुकसान; पंचनाम्याची मागणी.
नायगाव : बाळासाहेब पांडे नायगाव तालुक्यात 31 मे 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक गावांना तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेली, काही घरांची पडझड झाली तर शेतातील सौरऊर्जा प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले. या वादळात लालवंडी येथील शेतकरी काळेश्वर पिराजी बोमनाळे यांच्या शेतातील सोलार यंत्रणा उन्मळून पडल्याने मोठे…
-

अकाली निधन झालेल्या श्रीधर पांचाळ यांच्या कुटुंबाला ३१ हजार ७०० रुपयांची मदत ; वसंत सुगावे पाटील मित्रमंडळाचा पुढाकार; शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन.
नायगाव : बाळासाहेब पांडे घुंगराळा येथील युवा कलाकार तथा कीर्तन, सप्ताह आणि विवाह सोहळ्यांमध्ये गायन-वादन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे कै. श्रीधर गोपीनाथ पांचाळ यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी पुढाकार घेत मित्रमंडळाच्या माध्यमातून ३१ हजार ७०० रुपयांची आर्थिक मदत जमा करून…
-

पीकविमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा; अन्यथा जिल्हा बंद आंदोलनाचा इशारा ; शिवराज पा. होटाळकर.
नायगाव : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मंजूर झालेला पीकविमा अद्यापही खात्यात जमा झालेला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. येत्या खरीप हंगामाच्या पेरण्या तोंडावर आल्या असताना शेतकऱ्यांना बियाणे व खत खरेदीसाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे मंजूर पीकविमा तात्काळ वितरित करण्यात यावा, अन्यथा जिल्हा बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी…
-

अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनात ; लहूजी शक्ती सेनेचे तहसीलदार माहूर यांचे मार्फत सदस्य सचिव बार्टी यांना निवेदन.
माहूर- अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणास लहूजी शक्ती सेनेने समर्थन दिले असून माहूर शाखेच्या वतीने सदस्य सचिव तथा महासंचालक,बार्टी (BARTI) / सामाजिक न्याय विभाग,महाराष्ट्र शासन,मंत्रालय, मुंबई यांना तहसीलदार माहूर यांचे तर्फे निवेदन पाठविण्यात आले आहे. . सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानुसार राज्यात एससी आरक्षणात उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्या अनुषंगाने आरक्षणाचा समन्यायी लाभ:…
-

जन्मदिनी वसंत सुगावे पाटील स्व. अजितदादांच्या स्मृतिस्थळी भावूक ; बारामतीत नतमस्तक होत वाहिली आदरांजली; वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय.
नायगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही जल्लोष न करता स्व. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत बारामती येथे त्यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. अजितदादांच्या अकाली निधनाच्या वेदना आजही कायम असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी यंदाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर बारामती येथे पोहोचलेल्या वसंत सुगावे पाटील यांनी…