Category: Uncategorized
-

सिंगम पोलिस अधिकारी मुळे यांच्या बदलीने अवैध व्यवसायिकात फुटल्या आनंदाच्या उकळ्या, . .
जयकुमार अडकीने ( शांतता व सुव्यस्था विशेष ). माहूर येथील प्रभारी पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या बदलीची वार्ता कानी पडताच विविध अवैध व्यवसायीकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असून शांतता व सुव्यस्था प्रेमी नागरिकात थोडी ख़ुशी थोडा गम असे वातावरण आहे. अवैध व्यवसायाने पुन्हा डोके वर…
-

राहेर तीर्थक्षेत्रात वेद पाठशाळा व गोशाळा उभारण्याची मागणी
नायगाव, श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर संस्थान, राहेर यांच्या वतीने राज्यसभा खासदार मा.ना. अजित गोपछडे यांच्याकडे राहेर येथील तीर्थक्षेत्र परिसरात वेदपाठशाळा व गोशाळा सुरू करण्याची मागणी करणारा औपचारिक निवेदन सादर करण्यात आल आहे.गोपचडे नकीच लक्ष घालतील असा विश्वस्त यांना विश्वास राहेर हे प्राचीन व ऐतिहासिक महत्वाचे तीर्थक्षेत्र असून, मराठवाड्यात “देवाचे माहेरघर” म्हणून प्रसिद्ध आहे. हे…
-

ब्राह्मण महासंघ नायगाव च्या वतीने स्वा.सावरकर जयंती साजरी.
नायगाव स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांची १४२ वी जयंती आ.भा.ब्राह्मण महासंघ नायगाव शाखेच्या वतीने बुधवारी सायंकाळी कुलस्वामिनी इलेक्ट्रिक दुकान येथे साजरी करण्यात आली.या वेळी ब्रह्म मित्र भा. ग.मोरे,धनराज शिरोळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानीआ.भा.ब्राह्मण महासंघ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे हे होते. या वेळी युवाअध्यक्ष प्रज्योत कुलकर्णी, तालुका सल्लागार श्याम कुलकर्णी, सुधीर जोशी कापसिकर,ॲड राजेश कुलकर्णी,रोहन…
-

२४ वर्षा नंतर स्नेह मेळाव्यात सर्व वर्गमित्र आले एकत्र
नायगाव : बाळासाहेब पांडे श्री शंकराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलंबी येथील२००१ दहावी बॅच च्या विद्यार्थ्यांनी दोन तप पार पडल्या नंतर तब्बल २४वर्षा नी हॉटेल सिटी प्राइड नांदेड येथे मैत्रीचा अनोखा सोहळा नुकताच घेतला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ शिक्षक तथा साहित्यिक पी.बी.वाघमारे सर प्रमुख पाहुणे वाय. एफ आदमनकर सर, जे. एस.शिंदे सर,…
-

हदगाव तालुक्यांतील उमरी जहागीर येथील वृक्षप्रेमी संजय लगड यांनी स्वखर्चाने श्रमदानातून झाडांना रंगरंगोटी करत केले वृक्ष संवर्धन…
नांदेड: संजय कोंडिबा लगड हे हदगाव तालुक्यातील उमरी जहागीर येथील रहिवाशी असून ते रोजमजुरी करून आपले घर व संसार चालवतात संजय यांना वृक्षावर असलेले प्रेम त्यांनी यावेळी आपल्या श्रमदानातून दाखवले आहे. आपल्या रोज मजुरीतून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी स्व इच्छेने श्रमदान करीत गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांची रंगरंगोटी केली आहे. संजय यांचे नववीपर्यंत शिक्षण झालेले असून,…
-

अवकाळी पाऊस, वारा आणि गारपिटीमुळे केळी पिकाच प्रचंड नुकसान.
नांदेड जिल्हात झालेल्या वादळी वारा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे अर्धापूर तालुक्यातील केळी, आंबा, यासह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. केळी पपई यासारख्या नगदी पिकांना विम्याचे…