ताज्या बातम्यानांदेडनायगाव

परडवाडी येथील रुग्णाला तराफ्याहून दवाखान्यात नेण्याची आली पाळी पुलाची उंची कमी असल्याने पुलावर साचले पाच फुटापर्यंत पाणी.

कुंटूर : अनिल कांबळे

नायगाव तालुक्यातील कुंटूर पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेली परडवाडी येथील गावांमध्ये जाण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 2021 22 मध्ये कुंटूर ते परडवाडी पर्यंत डांबरीकरणाचे काम आले. परडवाडी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम गुत्तेदाराने केले नाही निकृष्ट दर्जाचे रोडचे डांबरीकरण करून फरार झाला हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून गुत्तेदराने बनवलाच नसून जुन्याच पुलावर रस्ता टाकून काम केले . सदर हा फुल जमिनीच्या खाली चार फूट असल्यामुळे त्याची उंची जमिनीच्या वर नसल्यामुळे सदर ओढ्याचे पाणी व गोदावरी नदीच्या बॅक वॉटर मुळे तब्बल पाच फुटापर्यंत त्या पुलावर पाणी साचले होते. त्यामुळे परडवाडी येथील रुग्ण बिमार पडल्याने मारुती धोंडीबा वजीरगे ह्या रुग्णाला तराफ्यामधून उपचारासाठी हॉस्पिटलला नेण्यात आले. त्यामुळे परडवाडी येथील सर्व नागरिक व महिला भयभीत झाल्या असून सदर पाण्याचा वेग वाढत असून नदीच्या बॅकवॉटरमुळे सांगवी धनंज. मेळगाव .हुस्सा .राहेर कुंटूर, अशा सर्व गावाला पाण्याच्या पुराचा वेडा बसला आहे. सदर परडवाडी ते कुंटूर ह्या रस्त्यासाठी एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता . सदर डांबरीकरणाचे काम व पुल बांधण्याचे काम सदर गुत्तेदारा मार्फत करा असेच सांगितले होते .मात्र गुत्तेदाराने पूल बांधलाच नाही व रस्ता डांबरीकरणाचा करून फरार झाला असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळेच सध्या गोदावरी नदीच्या बॅक वॉटर मुळे परडवाडी येथील नागरिकांना मात्र मोठे जीवघेणी कसरत करावी लागत आहे. सदर परडवाडी हा रस्ता सांगवी मेळगाव धनंज गावाकडे यासाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण कुंटूर ते सांगवी हा रस्ता बॅक वॉटर मुळे पूर्ण बंद झाला आहे .सांगवी, मेळगाव, धनज ,गावकऱ्यासाठी परडवाडीच्या रस्त्याने वाहतूक होते . चारही गावच्या लोकांना त्रास मात्र झाला नसता अशी माहिती ही परडवाडी गावकरी यांनी दिली आहे. तसेच गावातील नागरिक यांनी सदर पुलाची उंची वाढवून देण्यात यावी व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या गुटेदराला पुन्हा रस्ता दुरुस्ती करून देण्यात यावी अशी मागणी केली आहे. छोट्या पुलामुळे वारंवार पुराचा धोका निर्माण होत असून नागरिकांच्या जीव धोक्यात घालून दवाखान्यात नेण्याची पाळी आली असून सदर पुराच्या पाण्यामुळे नागरिक गावाच्या बाहेरही निघता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती परडवाडी येथील गावकऱ्यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!