
कुंटूर येथील ग्रामसभा ठरली वादळी नागरिकांचा प्रश्नांचा भडिमार एक कोटी 54 लाख तीन वर्षात खर्च कामे मात्र शून्य ?. पैशाचा हिशोब द्या वापस ग्रामपंचायत खात्यात भरा नागरिकांचा प्रश्न.?. दोन वर्षात दोनच ग्रामसभा व दोनच मासिक सभा ग्रामपंचायत सदस्याची माहिती!.
कुंटूर : अनिल कांबळे
नायगाव तालुक्यातील कुंटूर येते आज दिनांक 21-8-2025 रोजी, ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेचे अध्यक्ष पदसिद्ध सरपंच सौ.आशाताई मारुती कदम हे होते तर ग्रामविकास पदाधिकारी म्हणून नागेश येडसंवार यांनी सदर ग्राम सभेला सुरुवात केली . त्यांनी मागील झालेल्या कामाचा आढावा पुढील होणारे कामे त्यातच परिपत्रकांचे वाचन व काही बालविवाह बंदी, प्लास्टिक मुक्त, तंबाखूमुक्त गावाच्या विविध पत्रकाचे वाचन करून ग्रामसभेला सुरुवात केली. सदर कामे स्वच्छता पाणीपुरवठा दिवाबत्ती, लाईट पोल, नाली बांधकाम सी सी रस्ते, सी सी नाली, स्वच्छत , धूर फवारणी, अशा विविध कामा अंतर्गत कूंटूर येथील 15 वित्त आयोगाअंतर्गत एकूण एक कोटी 54 लाख रुपये तीन वर्षांमध्ये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या एकच गोंधळ उडाला असून सदर कामे कुठे केली केव्हा खर्च झाला याची माहिती आम्हाला सदरील नियोजनबद्ध द्या असे नागरिकांनी सांगितले . त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अफरोज चौधरी यांनी तर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरले त्यांनी सदर लाखो रुपयांची उचल का केली केव्हा केली त्या तारीख सहित त्यांनी उत्तर दिले . ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर समाधानकारक दिले नसून कामे कुठे केली या गल्लीतले कामे एकाच कामावर तीन-तीन बार पैसे उचलल्याचे स्पष्ट दिसून आले. पाणीपुरवठा , नळ फिटिंग ,नळदुरुस्ती, हातपंप दुरुस्ती ,शौचालय अर्धवट, रंग रोटी अर्धवट , फर्निचर खरेदी अंगणवाडी विभाग दवाखाना एरो फिल्टर, स्वच्छता ,पाणीपुरवठा ,नाली बांधकाम, दिवाबत्ती , विविध कामांतर्गत एक कोटी 54 लाख रुपयाचा निधी खर्च होऊन उचल करण्यात आला ग्रामविकास पदाधिकारी व सरपंच यांच्या सहीने झाले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना यांच्या कसलाच मागोवा लागला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामविकास अधिकार्यांना सागितले की सदर पैसे खात्यात वापस भरा अन्यथा तुमच्या पगारीतून कामे करा अशी त्यांनी सांगितले . एकच गोंधळ उडाला गावामध्ये विविध योजनेअंतर्गत लाखो रुपयांचा निधी येतो व ते उचलले होते या गल्लीतले कामे दाखवून त्या गल्लीमध्ये कामी केली असे सांगून लाखो रुपये दिवाबत्ती नळ फिटिंग कामे केली जात आहे. त्यातच एक बलप एलईडी बलब सहा हजार तीनशे , खरेदी केल्याचे . स्पष्ट झाले असून त्यामध्ये तीन लाख वर रुपये उचल झाल्याचे स्पष्ट झाले . नाली बांधकाम आली रस्ते कर्मचारी खर्च ग्रामपंचायत फर्निचर जिल्हा परिषद शाळा रंग रोटी अशी विविध कामे मात्र प्रत्यक्षात दिसत नाही . अशी नागरिकांनी सांगितले स्वच्छता नाही, ना दीवे ,साफसफाई नाही ,धूर फवारणी नाही, पाण्यात ब्लिचिंग पावडर नाही, अशा सर्व योजना नागरिकांनी सांगल्याने ग्रामविकास अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली . लाखो रुपये कसे उचले केले त्यांना कोणाचा आधार आहे . ठराव कसा पास केला तुम्ही एक एक महिना गावात येत नाही .आमची कामे का झाली नाहीत असे उत्तरही यावेळी सामाजिक कार्यकर्ते अफरोज चौधरी यांनी सांगितले. गावांमध्ये 1 जानेवारी 2025 पासून पहिल्यांदाच ग्रामसभा झाले .त्यामुळे तब्बल आठ महिन्यांमध्ये एक पहिलीच ग्रामसभा आपल्याशी ग्रामविकास अधिकाऱ्याने हे मान्य केले .त्यामुळे 425 घरकुल धारकांना 15000 रुपयाचा लाभ मिळालाच नाही या ग्रामविकास पदाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे व गावात येत नसल्याने नागरिकांच्या गावात येणाऱ्या योजनेवर पाणी फिरले असल्याचे स्पष्ट नागरिकांनी सांगितले . त्यामुळे घरकुल योजना स्वच्छालय तसेच गाय गोटा विविध योजनेचा लाभ नागरिकांना मिळत नसल्याची सांगितले. ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली करा यांना हाकलून द्या असे विविध उत्तर नागरिकांनी ग्रामसभेमध्ये दिली आहे. मासिक सभा ही वेळेवर घेत नसून तब्येत आठ महिने झालं मासिक सभा झाली नाही .असे ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत पाटील कदम यांनी सांगितले . त्यामुळे लाखो रुपयांची उचल झाली , ग्रामपंचायतीला प्राप्त झाला त्यांची विल्हेवाट कुठे लावली असे आम्हाला उत्तरही देत नाहीत व आम्हाला विचार येत नाहीत त्यामुळे सरपंच व ग्रामविकास अधिकारीच मनमानी कारभार करत आहेत असे स्पष्ट त्यांनी ग्रामसभेत सांगितले. सदर ग्रामसभा हे 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली असून दोन वाजून 47 मिनिटं तब्बल चार तास 47 मिनिटापर्यंत ग्रामसभा चा घोळ सुरू होता . नागरिक मात्र एकावर एक असे एकूण प्रश्नांचा भडीमार केल्याने ग्रामविकास अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही. त्यांनी केलेल्या कामाची पावतीही त्यांना देते आली नाही . त्यामुळे कामे मात्र शून्य लाख रुपयांचा निधीची उचल करून लाखो रुपयाचा घोळ केल्याचे स्पष्ट नागरिकांनी सांगितले. त्यामुळे उत्तर द्या व सदर पैसे उचललेले खात्यात वापस भरा अशीही यावेळी शंकर पाटील अडकिने यांनी सांगितले . एकाच कामावर तीन-तीन दिले उचलले व दाखवून दुसऱ्या जागचे बिल उचलले असे स्पष्ट छायाचित्र आफरोज चौधरी यांनी ई ग्राम स्वराज्याच्या साइटवरून काढून सभेमध्ये सर्व नागरिकांना दाखवले. त्यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्याची बोलतीच बंद झाली. लाखो रुपयांची उचल केली व उचलून पैसे कुठे गेले याचा उत्तर द्या ग्राम विकास अधिकारी शांत बसून पाणी प्यायला लागले . त्यामुळे लाखो रुपयाचा घोळ झाला असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सदर ग्रामपंचायतच्या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मात्र ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सभा मोकळ्या जागेत न घेता बंदिस्त सभागृहात घेतली, मात्र नागरिक यावेळी उभा राहून ग्रामसभेच्या लाभ घेतला त्यातच महिला सदस्य दोनच उपस्थित होते . त्यात सरपंच महिला व एक कर्मचारी महिला असल्याने ग्रामसभेमध्ये 50% महिलांची उपस्थिती नव्हती स्पष्ट दिसून येत आहे. तरीही ग्रामसभा पूर्ण होऊन ग्रामसभा झाले असे स्पष्ट ग्रामविकास अधिकारी नागेश्वर येरसणवार यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामविकास पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारास कुंटूर येथील नागरिकांनी कंटाळलेले आहेत. नागरिकांची कामे होत नसल्यामुळे सदर ग्राम विकास अधिकाऱ्यांची बदली करा व त्यांनी केलेल्या बोगस कामाची चौकशी करून सदर निधी वापस खात्यात भरा असे स्पष्ट यावेळी सामाजिक कार्यकर्त अफरोज चौधरी, शंकर पाटील अडकिने ,रसूल शेख, सुनील शिंदे ,दत्तात्रय संगेवार मारोती यनावर व सर्व कूंटूर गावातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितल्याने . ग्रामसभा चांगलीच गाजली व तब्बल साडेचार तास ही ग्रामसभा सुरु होती. ग्रामपंचायत मध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या बोगस कामाची चौकशी करा व येथील निधी कसा वितरित केला कोणाला विचारून निधी वाटप झाल्या याची माहिती द्या असे स्पष्ट संतप्त नागरिकांनी ग्रामविकास पदाधिकारी व सरपंच यांना धारेवर धरले पुढील कामाची चौकशी करून योग्य ते कारवाई करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी
केली आहे.

