ताज्या बातम्यानांदेड

कसारपेठ येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड ; हजारो रुपयांचे रसायन आणि साहित्य नष्ट.

यापुढे गावात हातभट्टी दारू आढळल्यास पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवकावर गुन्हे दाखल होणार  ;  पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांचा इशारा.

श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने

माहूरचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी तालुक्यातील मौजे कासारपेठ येथील शेतात असलेल्या गोठ्याच्या समोरील लिंबाचा झाडाखाली हातभट्टी दारू काढण्यासाठी जमाविलेले रसायन मोहफुल व इतर साहित्य धाड टाकत एकूण पंचवीस हजाराचा मुद्देमाला नष्ट करून एका शेतमालका विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना दि ११ रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली आहे

पोलीस उपमाहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचा मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक देविदास चोपडे अवैध धंद्याविरुद्ध स्वतः धाडी टाकत असून हातभट्टी दारू विरुद्ध त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असल्याने खबऱ्यामार्फत सूचना मिळताच् हातभट्टी दारू काढणे सुरू करण्याआधीच धाडी टाकत असून दोन दिवसा आधीच पापलवाडी येथे मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता ज्या गावात हातभट्टी दारू पकडण्यात आली त्या गावात पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे स्वतः जनजागरण करीत आहेत तर नवीन कायद्या नुसार आता पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाही केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे गुप्त खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे कासार पेठ येथे शेतातील गोठ्यासमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली हातभट्टी दारू काढण्यासाठी प्लास्टिक टाक्या मोहफुल आणि रसायन असा एकूण 25 हजाराचा मुद्देमाल जमवला असल्याची खबर मिळाल्यानें त्या ठिकाणी धाड टाकण्यात आली आणि सर्व साहित्य नष्ट करून हातभट्टी लावण्याच्या तयारीत असलेल्या शेतमालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

धाड टाकल्याची फिर्याद पोका पवन राऊत यांनी दिली तर कार्यवाहीत पोहेका प्रकाश गेडाम सागर डरंगे ज्ञानोबा खंदाडे यांनी भाग घेतला तर पोहेका श्रीमती पुष्पा पुसनाके यांनी गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!