ताज्या बातम्यानांदेड

शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला ; महिलेचे मुंडके जबड्यात पकडल्याने झाल्या गंभीर जखमा।.

पुढील उपचारासाठी केले यवतमाळला रेफर ; नरभक्षी झालेल्या बिबट्याला तात्काळ जेर बंद करा मागणी शेतकऱ्यांची मागणी .

श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने

माहूर तालुक्यातील मौजे बामनगुडा येथील शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून महिलेचे तोंडच जबड्यात धरून चावल्याने महिला गंभीर जखमी झाली असून तिला सिंदखेड येथे प्राथमिक उपचार करून माहूर ग्रामीण रुग्णालयामार्फत पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्याची घटना दि 23 रोजी दुपारी 2 वाजता घडल्याने शेतकऱ्यासह नागरिकात प्रचंड दहशत निर्माण झाली असून नरभक्षी बिबट्याला तात्काळ जेर बंद करण्याची मागणी होत आहे

माहूर तालुक्यात अनेक बिबटे मुला बाळा सहित धुमाकूळ घालत असून अनेक वर्षापासून बिबट्याने नागरिकावर हल्ला केला नव्हता परंतु आज बामनगुडा येथील शेतात काम करणारी महिला लता सुरेश तोडसाम वय 35 ही आपल्या पतीसह मुलगा आणि एका शेतशेजाऱ्या सोबत कापूस वेचण्याचे काम करत होती तितक्यात काही काम निघाल्याने पती सुरेश तोडसाम हे घरी गेले तितक्यातच शेताला लागून असलेल्या जंगलातून बिबट्याने त्यांच्यावर अचानकपणे झडप घालून जबड्यात महिलेचे मुंडकेच पकडून कडाडून चावा घेतल्याने महिलेला गालावर गंभीर जखम आली तर कपाळावर तसेच मानेवरही मोठ्या प्रमाणात त्याचे दात खोल रुतल्याने जीवघेण्या जखमा झाल्या घटना पाहून मुलाने आणि शेजाऱ्याने जोरात आरडा ओरड केल्याने महिलेला सोडून बिबट्याने जंगलात पळ काढला त्यामुळे महिलेचा जीव वाचला

मुलाने घटना पतीला कळविल्याने त्यांनी लगेच शेतात धाव घेत महिलेला घरी आणून सिंदखेडच्या प्रथमिक आरोग्य केंद्रात नेले असतात येथे डॉ बी एम मोरे यांनी प्रथमोपचार करून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले येथे डॉ मंगेश नागरगोजे ब्रदर निलेश भिलावेकर कक्षसेवक तुळशीदास शेंडे सुरक्षारक्षक आकाश मुंडे यांनी उपचार करून यवतमाळ येथे 108 द्वारे डॉ सत्यम गायकवाड चालक सिद्धार्थ भालेराव यांचे निगराणीत यवतमाळला पाठवले महिलेवर हल्ला करून बिबट्या नरभक्षी झाल्याने त्याला तात्काळ जेर बंद करावे अशी मागणी नागरिकांतून होत असून वन विभागाने तात्काळ पावले उचलावीत अन्यथा नागरिकाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!