
नायगाव :
शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांच्या प्रेरणेतून समाजसेवेची वाटचाल करणाऱ्या रेखाताई बनसोडे देवकर यांचा मुंबईत मोठ्या सन्मानाने गौरव करण्यात आला.
कामाई देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा म्हणून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या रेखाताई बनसोडे यांना “लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार – २०२५” हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रसिद्ध अभिनेत्री अल्का कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा गौरव सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात पार पडला. समाजसेवेतील निस्वार्थी समर्पण, दूरदृष्टीपूर्ण कार्यपद्धती आणि प्रेरणादायी उपक्रम यांचा सन्मान म्हणून विश्वनायक लोकसंसद फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार देण्यात आला.
या प्रसंगी दिग्दर्शक मनमोहन देसाई, अभिनेता रोहित कोकाटे, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, आयुष्यमान भारतचे अध्यक्ष ओमप्रकाश शेट्टे तसेच संस्थेचे अध्यक्ष सुरेश यादव हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यंकट पाटील हंबर्डे यांचीही उपस्थिती लाभली.
गेल्या अनेक वर्षांपासून रेखाताई बनसोडे देवकर या शेळगाव छत्री (ता. नायगाव) येथे सामाजिक बालक आश्रमाचे यशस्वीपणे संचालन करत आहेत. गरजू, निराधार आणि वंचित मुलांना शिक्षण, निवारा आणि संस्कार देण्याचे त्यांचे कार्य समाजात प्रेरणादायी ठरले आहे.
या सन्मानानंतर रेखाताई बनसोडे देवकर यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तानाजी पाटील आणेराये, अशोक कुंभार, भास्कर पाटील आणेराये, साईनाथ महाराज, नांदेड जिल्ह्याचे गौरी गुरू व त्यांचा सर्व संच, सय्यद अशीफा, बालाजी वारले, संजय लांडगे, बालाजी आर्मी, संतोष किन्हाळकर, सुनंदा जोगदंड, मनमथ मालेगावे यांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

