ताज्या बातम्यानांदेड

महात्मा फुले समता परिषदेच्या माहूर तालुकाध्यक्ष पदी सचिन बेहेरे यांची नियुक्ती ! .

जयकुमार अडकिने

माहूर- महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीची परभणी येथे एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. त्यामध्ये राज्यभरात संघटनात्मक रचनेत काही महत्वाचे बदल वरिष्ठ पदाधिकारी यांनी केले. त्यामध्ये माहूर तालुका समता परिषदेच्या माहूर तालुकाध्यक्ष पदी माहूर येथील समता सैनिक श्री सचिन भारत बेहेरे यांची माहूर तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुनील बेहेरे यांच्या स्वाक्षरीने परभणी येथे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, प्रदेशाध्यक्ष अॅड.सुभाष राऊत,ईश्वर बाळबुद्धे, प्राचार्य सत्संग मुंडे, समाधान जेजुरीकर, डॉ. नागेश गवळी प्राचार्य संतोष वीरकर, आबा खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत समीर भुजबळ हस्ते सचिन बेहेरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या बैठकीस माहुर तालुक्यातील किसन दामा राठोड, सदबा मूंडे, राजु सौंदळकर,निलेश वाघमारे, कुणाल बेहेरे आदी समता सैनिक उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व स्तरातुन सचिन बेहेरे यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!