
माहूर : येथील आंबेडकर चौकात आज सायंकाळी अजितदादा यांच्या निधनाच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गावातील नागरिक, विविध पक्षांचे कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी उभे राहून दोन मिनिटे मौन पाळत त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयत व भावनिक वातावरणात पार पडले.
या वेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात अजितदादांचे जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली विकासकामे तसेच सर्वसामान्यांप्रती असलेली बांधिलकी यांचा उल्लेख केला.
सभेत कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर मिळावा, अशी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रम शांतता व शिस्तीत पार पडला. उपस्थित नागरिकांनी शेवटी अजितदादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. यावेळी मेघराज जाधव निरंजन केशवे, अविनाश टन मने नंदू संतान, गोपू महामुने, विजय आमले वसंता कपाटे सईद अली राज ठाकूर, सुरेश गिरे,संतोष कोपुलवार, सचिन जासूद, गणेश दमलवार,

