ताज्या बातम्यानांदेड

कोलंबी येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रा प्रारंभ, जंगी कुस्त्यांचा फड व नाट्य महोत्सव.

नायगाव :

मौजे कोलंबी (ता. नायगाव, जि. नांदेड) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रा, जंगी कुस्त्यांचा फड तसेच नाट्य मंडळांच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन श्री १०८ महंत यदुबन गुरु गंभीरबन महंत महाराज यांच्या दत्तसंस्थान कोलंबी यांच्या कृपाशिर्वादाने करण्यात आले आहे.

या यात्रेचा शुभारंभ दिनांक ४ नोव्हेंबर २०२४ रोजी “छोटी महापूजा पौर्णिमा”ने झाला असून, पुढील तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ६ नोव्हेंबर रोजी “मोठी महापूजा”, ७ नोव्हेंबर शुक्रवार रोजी “पालखी सोहळा” आणि ८ नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी समाधी अभिषेक किर्तन,भजन व “, जंगी कुस्त्या फड भरणार आहे रात्री नाट्य मंडळांची मेजवानी” अशा कार्यक्रमांची रेलचेल असेल.                              दरवर्षीप्रमाणे या यात्रेसाठी परिसरातील तसेच जिल्हाभरातील भाविक, कुस्तीप्रेमी व कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. कोलंबी येथे होणारा हा पारंपरिक कुस्ती फड हा या भागातील एक जुना आणि मानाचा फड मानला जातो. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत विविध वजन गटांतील कुस्ती सामने रंगणार असून, विजेत्यांसाठी पहिला बहुमान ₹२१,१११, दुसरा ₹१५,१११, आणि तिसरा ₹११,१११ असा ठेवण्यात आला आहे.

याशिवाय यात्रेदरम्यान बालगीते, भजन-कीर्तन, बालमंडळींचे विविध सांस्कृतिक उपक्रम तसेच नाट्यप्रेमींसाठी नामांकित मंडळांची नाटके सादर केली जाणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोलंबी येथील समस्त ग्रामस्थ बांधव मंडळी, ग्रामस्थ व विविध समित्यांचे सहकार्य लाभले आहे.

या धार्मिक-सांस्कृतिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री १०८ महंत यदुबन गुरु गंभीरबन महाराज दत्त संस्थान कोलंबी व आयोजक समितीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!