
नायगाव :
तालुक्यातील ईकलीमाळ येथे परमपूज्य परब्रह्म श्री संत परबतेश्वर महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच मूर्तिस्थापनेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त श्रीराम जन्मोत्सव सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे. हा धार्मिक सोहळा १९ मार्च ते २६ मार्च २०२६ या कालावधीत श्री संत परबतेश्वर महाराज समाधी मंदिर परिसरात पार पडणार आहे.
या सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी गाथा पारायण, दुपारी प्रवचन तसेच सायंकाळी हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रात्री ८.३० ते ११ वाजेपर्यंत हरिकीर्तन व जागर होणार असून राज्यातील नामांकित कीर्तनकार उपस्थित राहून हरि भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत.
सप्ताहामध्ये ह.भ.प. श्री सुधीर महाराज पळसेकर (नांदेड), ह.भ.प. श्री गोविंद महाराज शिंदे (जालना), ह.भ.प. भागवताचार्य श्री योगेश महाराज अग्रवाल(वसमत), ह.भ.प. श्री महादेव महाराज राऊत, ह.भ.प. श्री सचिन महाराज ढोले (छत्रपती संभाजीनगर), ह.भ.प. चंद्रकांत महाराज खळेकर (आळंदी देवाची), ह.भ.प. भागवताचार्य श्री विश्वनाथ महाराज काकंडी कर,यांचे किर्तन होणार आहे
राम नवमी दि.२६ मार्च रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह.भ.प. रामायणाचार्य महंत समाधान महाराज भोजेकर रामजन्माचे कीर्तन होणार आहे.
२६ मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सवानंतर महाप्रसाद (भंडारा) तसेच सायंकाळी ७ ते १० वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून परिसरातील भाविक मोठ्या संख्येने यात सहभागी होणार आहेत.
दिनांक २७ मार्च रोज शुक्रवारी सकाळी दहा ते बारा ह. भ.प.सोपान महाराज सानप यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे या सप्ताहाचे आयोजन श्री संत परबतेश्वर महाराज संस्थान ईकलीमाळ समिती प्रमुख राजेश कुंटूरकर,व समस्त गावकरी मंडळी परिसरातील भक्त गण यांच्या वतीने करण्यात आले असून सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन-प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


