ताज्या बातम्यानायगाव

चार दिवसापासून कुंटूर परिसराला पुराचा वेढा गावातील नागरिकांना शेताकडे हि जाता येत नाही जनावरांना चाराही आणता येत नाही अद्यापही जनजीवन विस्कळीत .. लोकप्रतिनिधी निवडणूक आली की गावात येतात नागरिकांच्या समस्या असल्या की पळून जातात!.

चार दिवसापासून कुंटूर परिसराला पुराचा वेढा गावातील नागरिकांना शेताकडे हि जाता येत नाही जनावरांना चाराही आणता येत नाही अद्यापही जनजीवन विस्कळीत .. लोकप्रतिनिधी निवडणूक आली की गावात येतात नागरिकांच्या समस्या असल्या की पळून जातात…

कुंटूर :

नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कल अंतर्गत येणाऱ्या गोदावरी नदीच्या बॅक वॉटर मुळे कुंटूर ईकलीमाळ ,सांगवी ,कोकलेगाव या परिसरातील ओढ्याला पूर आला असून सदर बॅक वॉटर मुळे कुंटूर पासून तीन किलोमीटर पर्यंत पुराचा वेढा आजही तब्बल चार दिवसापासून रात्र दिवस पूर परिस्थिती आहे . त्यामुळे कुंटूर उमरी ,कुंटूर घुंगराळा , सांगवी अशा तिन्ही महत्त्वाचे रस्ते बंद झाले. आज चार दिवसापासून कुंटूर मध्ये पाण्याचा पूर सद्यस्थितीमध्ये असल्याने अनेक कामे खोळंबली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली असून त्यांच्याकडे असलेले पशुपालकांना चारा आणण्यासाठी पाण्यामधून शेताकडेही जाता येत नाही त्यातच गावांमध्ये पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे तीन दिवसापासून पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसून नागरिकांना फिल्टरचे विकत पाणी घेऊन प्यावे लागते अशी पाळी नागरिकांवर आली आहे. त्यातच ग्रामपंचायतीने कोणतेही उपायोजना केली नसल्याने पाणीपुरवठा बंद असून रात्रीच्या वेळी मच्छरचा प्रादुर्भाव ही वाढला आहे. त्यातच ग्रामविकास अधिकारी व सरपंच हे दुर्लक्ष करत असून नागरिकाकडे कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात नसल्याचे कुटूर येथील नागरिकांनी सांगितले. गावाला पुराचा वेढा असून लोकप्रतिनिधी आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी-माजी कार्यकर्ते मात्र उंदरासारखे दडून बसले की काय अशी चर्चा मात्र कुंटूर येथील शेतकरी व नागरिकाकडून होत आहे निवडणूक आले की पळापळ सुरू करून निवडून येण्यासाठी आटापिटा करतात व नागरिकांना भूलथापा देऊन काही खाण्यापिण्याचा खर्च देऊन आपली पोळी भाजून घेतात मात्र नागरिकांच्या समस्या दिसल्या की पळून जातात अशी परिस्थिती आमदार खासदार व कार्यकर्त्यांची झाली आहे सदर लोकप्रतिनिधी आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व वरिष्ठ अधिकारी सर्व पुराच्या पाण्यात वाहून गेले की काय अशी पोस्ट सोशल मीडियावर गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य पंडित पाटील अडकिने यांनी खंत व्यक्त केली आहे त्यामुळे गावात उलट सुलट चर्चेला उधान येत असून लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष कुंटूर परिसराला का होत आहे ?. याचे कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार विचारतील अशी चर्चा सामाजिक कार्यकर्ते अफरोज चौधरी यांनी केले आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तलावाच्या पाण्याचा विसर्ग कोण्या पद्धतीने होईल याच्याकडे काळजी करण्यात यावी त्यामुळे तब्बल कुंटूर परिसरातील अडीच हजार हेक्टर जमीन हे पाण्याखाली सध्याच्या स्थित आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून शेताकडे जाणे व जनावरांना चारा आणण्यास तसेच गावातील पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना मोठे कसरत करावी लागत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!