ताज्या बातम्यानांदेड

युवकांना या शिबिरातून सामाजिक बांधीलकी जोपासण्याची प्रेरणा – प्राचार्य विलास पाटील.

जनजागृती व विविध उपक्रम राबवित राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत जगू नाईक तांडा शिबीर संपन्न !

माहूर- : जयकुमार अडकीने

राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गतचे शिबीर म्हणजे युवकांना अष्टपैलु व्यक्तिमत्व घडविण्यात मैलाच दगड असून युवकामध्ये सामाजिक बांधिलकीचा प्रसार व्हावा असे प्रतिपादन रेणुकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य विलास पाटील यांनी केले. बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड शी संलग्नित असलेल्या श्री रेणुकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्रीक्षेत्र माहूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शाश्वत विकासासाठी युवक – जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकास या सात दिवसीय विशेष निवासी शिबीराचा दि. १० रोजी समारोप करण्यात आला.

दररोज सकाळी ५ वाजेपासून या शिबीराची सुरूवात करून , ६ ते ०७ या वेळेत योगासन, ७ ते ८ या वेळेत अल्पोपहार तर ८ ते १२ या वेळेत श्रमदान करण्यात येणार असून रात्रीला सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, प्रजनन आरोग्य, किशोरावस्था, ग्रामीण उद्योजकता, महिला आरोग्य, लोकसंख्या शिक्षण या सारख्या सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात आली. प्राचार्य विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संस्था समन्वयक उपप्राचार्य डॉ. जि.एम. गुरनुले, जि.प. प्रा. शाळा जगू नाईक तांडाचे मुख्याध्यापक दिगांबर जगताप, जेष्ठ पत्रकार जयकुमार अडकीने, रासेयो चे सहप्रमुख प्रा. अवधूत लांडे, महिला सहप्रमुख प्रा. श्रीमती पाटोदे, प्रा. पेंटावार हे होते. पुढे बोलतांना प्राचार्य पाटील यांनी सदरचे शिबीर यशस्वीपणे राबविल्या बद्दल रासेयो चे सर्व संबधित प्राध्यापक यांचे व अगदी समंजसपणे शिबिरात सहभाग घेऊन अत्यंत शिस्तीत गावकऱ्यांची व प्राध्यापक वृंदाची मने जिंकत शिबीर पार उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले व गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या गाण्यावर स्वतःची रचना केलेली “ लता एक झाड” ही कविता सादर करून उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनी मध्ये उत्साह भरला, यावेळी मुख्याध्यापक दिगांबर जगताप, जेष्ठ पत्रकार जयकुमार अडकीने यांनी समयोचित मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनी कु. समीक्षा चौधरी हिने शिबिरातील अनुभवाचे कथन मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन रासेयो प्रमुख डॉ. अभिजित कांडलीकर यांनी सूत्रसंचालन प्रा. कृष्णा दुगाळे यांनी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!