
नायगाव :
लालवंडी येथील कै. मैनाबाई मल्लिकार्जुन पाटील लंगडापुरे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी व कुटुंबीयांना धीर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार डॉ. अजितजी गोपछडे आणि नायगावचे आमदार राजेशजी पवार यांनी लालवंडी येथे जाऊन लंगडापुरे परिवाराची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी कै. मैनाबाई लंगडापुरे यांच्या निधनाबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत कुटुंबीयांना धीर दिला. “कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे जाणे ही मोठी पोकळी निर्माण करणारी घटना असते. अशा कठीण प्रसंगी धैर्याने उभे राहून त्यांच्या कार्याची परंपरा पुढे चालवावी,” असे सांगत त्यांनी लंगडापुरे कुटुंबियांना सांत्वन केले.
या प्रसंगी लक्ष्मणराव ठक्करवाड, उमाकांतराव गोपछडे, हाऊगीराव गोपछडे सर, चंद्रशेखर पाटील सावळीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच कै. मैनाबाई लंगडापुरे यांचे सुपुत्र पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लंगडापुरे, नायगाव विधानसभा प्रमुख राजेश लंगडापुरे, मोहनराव लंगडापुरे, सुभाषराव लंगडापुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव लंगडापुरे, भगवानराव लंगडापुरे यांचीही भेट घेऊन त्यांना धीर दिला.
यावेळी विजयप्रकाश जटाळे, व्यंकटराव इंद्रे, विश्वनाथराव केरूरे, हर्षल जारीकोटे, शिवराम तेरसनवार, सरपंच चिंटू जोंधळे, दत्ता रुद्रवाड, प्रताप बोमनाळे, युवराज लालवंडे, बळवंत पांडुरंग शिंदे, सखाराम कहाळेकर आदी उपस्थित होते.
कै. मैनाबाई लंगडापुरे या साध्या, प्रेमळ व समाजाभिमुख स्वभावामुळे गावात सर्वांच्या जिव्हाळ्याच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली असून त्यांच्या आठवणी अनेकांच्या मनात कायम जिवंत राहतील, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.


