
,माहूर .
दिव्यांग. दिव्यांग बांधवांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली असुन आता दिड हजार ऐवजी अडीच हजार रूपये महिना दिव्यांगाना देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.दिव्यांगाच्या मानधनात वाढ करावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चु भाऊ कडू यांनी राज्यभर आंदोलने केली होती रायगड येथील अन्न त्याग आंदोलन,मोझरी येथील उपोषण, पाबळ ते चिलगव्हाण आंबोडा येथील 138 कि.मी. पायदळ आंदोलन याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ केली असून या नंतर दिव्यांग बांधवास अडीच हजार रुपये महीणा मानधनात मिळनार आहे…
आमचे मार्गदर्शक दिव्यांग दैवत सन्माननीय बच्चु भाऊ कडू व महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार माणूण माहुर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी आनंद व्यक्त केला.
या वेळी प्रहार चे तालुकाप्रमुख किशोर हुडेकर, शहर अध्यक्ष बळवंत नागरगोजे,ता.सचिव गणेश जाधव, प्रभाकर नेव्हारे, मोतीसिंग ठाकूर, विलास दवणे,रुपेश जगताप,राजु पवार,ज्ञानेश्वर जाधव,डिगांबर चुनाळकर,महिला. वैशाली शेंडे,आशा जाधव, अनेक दिव्यांग बांधवांनी आनंद महोत्सव साजरा केला..

