ताज्या बातम्यानांदेड

पंचमी संगीत रजनी मोहोत्सवात, गायनासह नृत्यांचा अविष्कार! श्रोते मंत्रमुग्ध.

जयकुमार अडकीने

माहूर :मूळपीठ श्री रेणुका देवीच्या माहूरगडावर आकाशात पावसाच्या सरी गोंधळ,गवळणीवर रसिक ठेका धरी गायन ,वादन नृत्याच्याच्या अविष्काराने शारदीय ललिता पंचमी संपन्न झाली.                                                               श्री रेणुका देवी संस्थानचे सचिव जेनित चंद्रा दोन्तुला (सहाय्यक जिल्हाधिकारी ), अभिजित जगताप तहसीलदार,शारदा चोंडीकर तहसीलदार,विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय कान्नव, शुभम भोपी व श्री रमेश महाराज गिरणारी, निलेश केदार यांच्या हस्ते कलावंतांचा सन्मान करण्यात आला.                                                           सचिन शिंदेच्या नटराज डान्स अकॅडमी व विकास मगरच्या संचाने गोंधळ नृत्य, जोगवा नृत्यविष्कार सादर केला. पंडीत संजय जोशी (नांदेड ) यांनी संत विष्णुदासाचे बोल भवानी, सेतू बांधारे गावून टाळ्या मिळविल्या. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिन वादक पंकजकुमार शिरभाते यांनी उ. चेतन पांडेच्या साथीने देस राग वाजवून मंत्रमुग्ध केले. सारीका पांडेनी भक्ती गीत व प्रा. प्रतिभा पाटील यांनी माझी रेणुका माऊली संत विष्णुदासाचे पद गाऊन वाहवा मिळविली. गायक सुरेश पाटील यांच्या दत्ताच्या पालखीवर रसिकांनी ठेका धरला.                                                             भजन सम्राट प्रसन्न जोशी (नागपूर ) यांनी ऐसी लागी लगन व जोग राग , राहुल मानेकर यांनी रोडगा, गवळण गावून वन्स मोअर मिळविला . तबलावादक उ . रवि सातफळे व संवादी नी वादक प. श्रीकांत पिसे यांच्यात जुगलबंदी रंगली.लोककला प्रसारक प्रा. डॉ. शिवराज शिंदे (नांदेड ) यांनी शिवरंजनी रागातील दत्तगीत, मयुरी शिंदेचे माय भवानी,बाल गायिका स्वरांगी राणे देवी स्तवन गावून बक्षीस मिळविले.लक्ष्मीकांत धानोरकर,अदिती धानोरकर यांनी संत विष्णुदासांचे पद, शिरिषा पत्की यांनी देवीगीत,छत्रपती संभाजी नगर येथील ऋषिकेश अभ्यंकर, शिरिष शेषराव ,दीपक रत्नपारखी गायन सेवा केली. वीर रसाचा पोवाडा प्रा.मार्तंड कुळकर्णी यांनी गायला. प्रज्ञाचक्षु गायक पांडुरंग खंदारे अभंग,दलितानंद खडसेनी तुकडोजी महाराजांचे भजन,आदिशक्ती महिला भजनी मंडळ पुसद व जय गिरणारी महिला भजनी मंडळ लखमापूर यांनी स्वर सुमनाजंली वाहिली. नागपूरच्या राहुल मानेकर यांच्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.मार्तंड कुळकर्णी, प्राचार्य सुरेश पाटील यांनी तर आभार संजय कान्नव यांनी मानले.भक्तांमध्ये ललिता पंचमीच्या कार्यक्रमाची चर्चा होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!