Uncategorizedताज्या बातम्याधार्मिकनांदेड

श्री दत्ताच्या भरोशावर ; माहूर गडावर नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेनिमित्त लाखो भाविक दाखल ; महसूल पोलीस सह सर्व विभागाचे नियोजन कोलमडले!.

श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने

माहूर गडावर नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रा निमित्त लाखो भाविका दाखल झाले असून एसटीने 70 ते 80 बसेस आणल्या तरीही लाखो भाविक पाई गडावर जात असल्याने महसूल पोलीस वन विभागाचा बंदोबस्त तोकडा पडला असून आलेले लाखो भाविक जंगलातून पायी 27 ठिकाणांचे दर्शन घेत 25 किलोमीटरची यात्रा पूर्ण करणार असून जंगलातील नैसर्गिक पाणी पिऊन यात्रा संपन्न होणार असल्याने प्रशासनाने केलेले नियोजन तोकडे पडलेले दिसत आहे

माहूर गडावरील श्री दत्त शिखर चे दर्शन महंत श्याम भारती महाराज यांचे दर्शन घेऊन दि 27 रोजी सायंकाळी 5 वाजता परंपरेनुसार वेढ्याची अनवाणी पाई यात्रा सुरू झाली यात्रेत आलेले लाखो भावी 27 ठिकाणी दर्शन घेत 25 किलोमीटरची यात्रा पूर्ण करणार आहे लाखो भाविक एसटीसह मिळेल त्या वाहनाने गडावर दाखल झाले असून शहरातून पायीच शिखर संस्थांनसह सर्व ठिकाणांचे दर्शन घेत आहे उद्या दि 28 रोजी सायंकाळपर्यंत ही यात्रा सुरूच राहणार आहे

या परिक्रमेची फलश्रुती देवस्थानचे माहूर पीठाधीश्वर महंत श्री श्री श्री १००८ डॉ. श्री धनेश्वर भारती गुरु मधुसूदनजी भारती महाराज यांनी थोडक्यात या पंचक्रोशी परिक्रमेचे महात्म्य विशद करताना सांगितले की ३३ कोटी देवी देवता अदृश्य रूपाने ही परिक्रमा करतात ही पवित्र परिक्रमा केल्याने मन, व आत्मशुद्धी, होऊन अहंकाराचा नाश होतो, शरीराची पूर्ण आत्मशुद्धी होते, जन्मोजन्मांतराचे आणि पूर्वजन्माचे सर्व दोष व पापे नष्ट होतात, मोक्षप्राप्ती होते, भक्ताच्या जीवनातील संकटे दूर होऊन त्यांना अंतिम शांती आणि मोक्षाचा सुखकर मार्ग लाभतो अशी महती या यात्रेची असल्याने लहान थोर महिला वृद्ध सर्व भाविक या यात्रेत आनंदाने परिक्रमा पूर्ण करतात

यात्रेत आलेल्या भाविकांना पार्किंगच्या ठिकाणावर टॅंकरने पाणी पाजण्यात आले तर उर्वरित ठिकाणी भाविकांनी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन तहान भागवली तर जंगलात अनेक ठिकाणी नैसर्गिकरीत्या असलेले पाणी पिऊन यात्रा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे तहसीलदार अभिजीत जगताप साबाचे उपविभागीय अभियंता डी के भिसे तालुका कृषी अधिकारी व्ही बी चव्हाण पोलीस निरीक्षक देविदास चोपडे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधीक्षक एसटी विभागाचे अधिकारी यांचे सह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी भाविकांना त्रास होऊ नये म्हणून दक्षता घेत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button