Category: शैक्षणिक
-
हिंदी विषयाच्या बारावी परीक्षेत २२२२ विद्यार्थी उपस्थित; ५३ अनुपस्थित.
नायगाव: नायगाव तालुक्यात बारावीच्या हिंदी विषयाच्या परीक्षेसाठी एकूण २२७५ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी २२२२ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले, तर ५३ विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली. तालुक्यातील विविध केंद्रांवर शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने परीक्षा पार पडली. श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय शंकरनगर येथे २७७ पैकी ५ विद्यार्थी अनुपस्थित होते, तर जनता कनिष्ठ महाविद्यालय…
-

नायगाव तालुक्यात ११ केंद्रांवर बारावी परीक्षा; ४५७३ पैकी ९७ विद्यार्थी अनुपस्थित.
नायगाव : बाळासाहेब पांडे नायगाव तालुक्यात बारावीची परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात सुरू असून तालुक्यातील ११ परीक्षा केंद्रांवर एकूण ४५७३ विद्यार्थ्यांपैकी ९७ विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. लातूर विभागीय परीक्षा मंडळाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ११२ परीक्षा केंद्रांवर एकूण ४३,२६९ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. नायगाव तालुक्यात ओअॅसिस इंग्लिश स्कूल कुंटूर, जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर, जनता…
-

जीनियस किड्स स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धांना सुरुवात ; राजर्षी शाहू फाउंडेशन अंतर्गत जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
माहूर राष्ट्रीय स्तरावर नावाजलेली संस्था राजर्षी शाहू फाउंडेशन माहूर अंतर्गत जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय माहूरच्या प्रांगणात राजर्षी फाउंडेशनचे अध्यक्ष भाग्यवंत भवरे सचिव सौ शितल भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक तथा व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष तथा पत्रकार इलियास बावाणी यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन…
-

शिक्षकांमधील एकात्मतेने शिक्षण गुणवत्तेला नवा वेग!प्र.गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटील ; नायगाव तालुक्यातील सर्व सात केंद्रांची एकत्रित शिक्षण परिषद नायगाव येथे सपन्न.
नायगाव : बाळासाहेब पांडे नायगाव तालुक्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांनी एकरूपतेतून शैक्षणिक गुणवत्तेला चालना देत तालुक्याचा शिक्षण स्तर उंचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन नायगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मा. सुरेश पाटील यांनी केले. ते पंचायत समिती नायगावच्या नूतन प्रशस्त सभागृहात झालेल्या तालुक्यातील सर्व सात केंद्रांच्या…
-

अनमाळ येथील मुख्याध्यापक सारनाथ लोणे यांचा सेवापुर्ती सोहळा माहूर
माहूर- वंसतराव नाईक माध्यमीक विद्यालय अनमाळ, ता. माहूर येथील कार्यरत मुख्याध्यापक मा.श्री सारनाथ लोणे दि. 30/06/25 रोजी 32 वर्ष प्रदीर्घ सेवा देऊन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाले असल्यामुळे सेवापुर्ती सोहळा व निरोप समारंभ याचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार राठोड उपाध्यक्ष अजय राठोड, कार्यक्रमाचे अध्यक्ष किसनराव भवरे, प्रमुख पाहुने बळीराम अग्रवाल, माहुरच्या माजी उपनगरअध्यक्षा शोभाताई…
-

सीईटी परीक्षेत नायगावची कन्या अंजली आरगुलवार : 98% गुणांसह प्राविण्य!.
नायगाव / प्रतिनिधी नायगाव शहरातील कु. अंजली मनोज आरगुलवार हिने MAH-MHT CET (PCM गट) या राज्यस्तरीय प्रवेश परीक्षेत 98.00% गुण मिळवत आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेची चुणूक दाखवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाने संपूर्ण नायगाव तालुक्याचे नाव उज्वल झाले आहे. अंजली ही तिच्या अभ्यासू वृत्तीबरोबरच धार्मिक आणि आध्यात्मिक संस्काराने समृद्ध आहे. आई-वडील, आजी-आजोबा यांचे मार्गदर्शन, आणि महाराष्ट्रातील…
-

शासकीय शाळा वाचविण्यासाठी प्रा. डॉ. गड्डमवार यांचा अभिनव पुढाकार!.
नायगाव :- बाळासाहेब पांडे “शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये ५०% आरक्षणाची हमी दिल्यास, या शाळांची गुणवत्ता आणि विद्यार्थीसंख्या निश्चितच वाढेल,” असे प्रतिपादन प्रा. डॉ. शंकर गड्डमवार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नायगाव कॅम्प येथे आपल्या मुलाचा प्रवेश करून देताना केले. गड्डमवार सर हे स्वतः इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेचे संचालक असूनही त्यांनी…
-

जिल्हा परिषद हायस्कूल, घुंगराळा येथे प्रवेशोत्सवाने रंगली शाळा – लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शिक्षणाचा नवा सूर आळवला!.
नायगाव घुंगराळा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत बैलगाडी मिरवणुकीच्या पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. संपूर्ण गावातून ही मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे गावात उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाला नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. राजेशजी पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे…
-

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा येथे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गुलाबाचे फुल देऊन स्वागत .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा येथे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गुलाबाचे फुल देऊन स्वागत … नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे सोमठाणा तालुका नायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा येथील ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी, अधिकारी शालेय शिक्षण समिती व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग यांनी पहिल्या दिवशी मुलांना गुलाब पुष्प देऊन त्यांना पुस्तकांचे वाटप करून शाळेमध्ये…
-

पुनम ताई पवार यांच्या कडून मांजरम जिल्हापरिषद हायस्कूल मधील विद्यार्थी व शिक्षक यांचा सन्मान.
नायगाव जिल्हा परिषद हायस्कूल मांजरम येथे माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड पूनम ताई राजेश पवार व नायगाव पोलीस स्टेशनचे उप निरीक्षक तोटावाड साहेब यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुनम ताई यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले व या वेळी एक पेड मा के नाम वृक्ष रोपण कराण्यात आले पहिलीतील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना…