
एल.बी.रानडे
नांदेड शहरापासून जवळच असणाऱ्या सिडको, हडको भागातील गुरुवार बाजार परिसरात राहणाऱ्या वैभवच्या यशाचे जिल्हाभरात मोठे कौतुक होतंय, त्याचे कारण देखील प्रेरणादायी असेच आहे. दहावीत असताना वैभव पतंग उडवत होता. त्यावेळी शॉक लागल्याने त्याचे दोन्ही हाथ निकामी झाले, मात्र आलेल्या परिस्थितीशी न डगमगता झुंज देत वैभवने पायाने लिहण्याची कला शिकून घेतली आणि आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलं. आता मात्र वैभव शिवकुमार पईतवार च्या यशाचे जिल्हाभरात मोठे कौतुक होते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेतलेल्या परीक्षेत महसूल सहाय्य्क या पदासाठी त्याची निवड झालीय… आज वैभवच्या या जिद्दीच्या प्रवासाचा संपूर्ण नांदेड मध्ये कौतुक होतोय तो केवळ स्वतःसाठी नाही तर हजारो युवकांसाठी एक सजीव प्रेरणा ठरलाय.

