ताज्या बातम्यानांदेड

पुलाच्या बाजूला भराव न टाकल्याने शेती खरंडून गेली  ; भाजपा शहर उपाध्यक्ष निलेश जयस्वाल यांची तक्रार

श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार  अडकिने

धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्ग क्र. 161-A चे काम करतांना शारदा कन्सट्रक्शन कंपनीने हलगर्जी पणा केल्याने शेतात पावसाचे पाणी वाहून आल्याने शेतातील पिकाचे व शेतांचे खरडून गेल्याने नुकसान झाले झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी व शेतात वाहून येत असलेले पाणी तात्काळ बंद करून भविष्यकाळातील संभाव्य नुकसानीस आळ घालावा अशी तक्रार माहूरचे भाजपा शहर उपाध्यक्ष निलेश सुभाषलाल जयस्वाल आणि राधेश्याम मोहनलाल जयस्वाल यांनी निवेदनाद्वारे सर्व संबंधिताकडे केली आहे

धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्ग क्र. 161-A लगत मौजे नखेगाव ता. माहूर जि. नांदेड शिवारात गट क्र. 61 मध्ये क्षेत्र 0 हेक्टर 20 आर, आकार 0. 39 पैसे हे श्री राधेश्याम मोहनलाल जयस्वाल यांचे मालकी व ताब्यातील शेत आहे. सदर शेतालगत धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्ग क्र. 161-A महामार्गाचे बांधकाम करण्यात आले. सदर बांधकाम हे शारदा कन्सट्रक्शन कंपनी नांदेड यांनी केले असून सदरील काम करीत असतांना उपरोक्त शेतालगत त्यांनी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करून पावसाचे व नाल्याचे पाणी शेतात काढून दिले.

ज्यामुळे पावसाळ्यात पावसाचे व इतर काळात नाल्याचे पाणी सतत शेतात वाहून येत आहे. ज्यामुळे माझ्या शेतातील पिक व शेतजमीन खरडून जाऊन शेतजमिनीचे नुकसान झालेले आहे. ज्यामुळे गत 5 ते 6 वर्षापासून शेतात नाल्याचे व पावसाचे पाणी वाहून येत असल्याने शेतजमीन खरडून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रस्त्याच्या बाजूकडील अंदाजे 15 ते 20 फुट जमीन वाहत्या पाण्यामुळे कटली असून जाता येता सर्वांना दिसत असूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि शारदा कंट्रक्शन कंपनीने अद्याप येथे मुरूम किंवा माती टाकून संरक्षक भिंत उभारलेली नाही

धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्ग क्र. 161-A चे काम करतांना शारदा कन्सट्रक्शन कंपनीने हलगर्जी पणा करीत बांधकाम केल्याने माझ्या शेतात पाणी वाहून आल्याने शेतातील पिकाचे व शेतांचे खरडून नुकसान झाल्याने त्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी व शेतात वाहून येत असलेले पाणी तात्काळ बंद करून भविष्यकाळातील होणारे संभाव्य नुकसान टाळावे अशी विनंती निलेश जयस्वाल राधेश्याम जयस्वाल यांनी निवेदनाद्वारे केल्याने शेतकऱ्यांना मावेजा मिळतो की कंपनी पूर्वीप्रमाणे ताठर भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!