ताज्या बातम्यानांदेड

जाणीवपूर्वक विलंबाने डाक पोहच करून मानसिक त्रास ; मदनापूर येथील नागरिक गणेश राजूरकर यांची डाक निरीक्षक व पोस्ट मास्तर कडे तक्रार.

जयकुमार अडकिने

माहूर – आरटीओ कार्यालय नांदेड मार्फत पाठविण्यात आलेले आरसी बुकचे पार्सल आर्टिकल नंबर TA555848656IN हे पत्यावर पोहच पर्यत पोहचविण्यात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी संबधित व्यक्तीस न देता त्रयस्थ व्यक्तीकडे देऊन जाणीवपूर्वक विलंब केल्या प्रकरणी चौकशी करून पोस्टमन विरुद्ध कारवाई करा अशी मागणी मदनापूर येथील नागरिक गणेश नामदेव राजुरकर यांनी डाक निरीक्षक किनवट व सब पोस्ट मास्तर वाई बा, यांना तक्रार सादर केली आहे.

आपण खरेदी केलेल्या हिरो कंपनीची स्पेलंडर मोटरसायकल चे आरसी बुक आरटीओ कार्यालय नांदेड यांचेकडून पार्सल आर्टिकल नंबर TA555848656IN व्दारे मला माझ्या पत्यावर मु.पो. मदनापुर ता. माहूर जि.नांदेड या पत्यावर पाठविले. सदरील पार्सल दि.26/12/2025 रोजीच्या टपाल मध्ये पोस्टमन मदनापूर यांचेकडे आले. परंतु त्यांनी मला न देता तब्बल 4 दिवसानंतर आमच्या गावातील व्यक्ती नामे विष्णू वाघाडे यांचेकडे ठेवले. त्यानंतर विष्णू वाघाडे यांनी मला फोन करून पार्सल घेण्यास सांगितले. परंतु माझे पार्सल दि.26/12/2025 च्या टपाल मध्येच पोस्टमनकडे आल्यानंतर पोस्टमन यांनी माझे पार्सल मला देण्यास तब्बल 4 दिवस टाळाटाळ करून हलगर्जीपणा केला आहे. ज्यामुळे मला आरसीबुकचे अर्जंट काम असतांना केवळ पोस्टमनच्या हलगर्जीपणामुळे माझ्या कामाचा खोळंबा होऊन मला प्रचंड मानसिक त्रास झाला. त्यानंतर मला जेव्हा विष्णू वाघाडे यांनी दि.31/12/2025 रोजी पार्सल घेण्याकरिता बोलावले तेव्हा मी तब्बल 4 दिवस उशीर झाल्याने पार्सल घेण्यास नकार दिला व वाई बाजार येथे टपाल कार्यालयात माझे पार्सल दि. 26/12/2025 रोजीच्या टपाल मध्ये मदनापुर येथील पोस्टमनकड़े प्राप्त झालेले असतांना माझ्या पर्यत पोहच करण्यास 4 दिवस विलंब कशामुळे करण्यात आला याबाबत विचारपूस करण्याकरिता टपाल कार्यालय वाई बा. येथे आलो असता, मदनापूर येथे नियुक्ती असलेल्या पोस्टमन  यांना विचारपूस करीत असतांना टपाल कार्यालयातील काही सहकारी पोस्टमन व कर्मचाऱ्यांनी माझी परवानगी न घेता माझे व्हिडीओ चित्रीकरण केले. आणि मलाच दमदाटी करून “ तु इथे कसा काय आलास, इथे येऊन आमचे डोके खाऊ नकोस, आता तुझे व्हिडीओ काढलेला आहे आम्ही तुझ्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याची पोलीस तक्रार करून तुला जेल मध्ये टाकतो, परत इकडे आलास तर खबरदार ” असे म्हणून मी विचारलेली माहिती न देता उलटच मलाच दमदाटी केली. मदनापूर येथील कार्यरत पोस्टमन  भद्रे यांनी यापूर्वी सुद्धा माझ्यासोबत दोन वेळा माझ्या पार्सल बाबत हलगर्जीपणा केलेला असल्याने यापूर्वी सुद्धा मला त्रास झालेला आहे. असे तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे सदर पोस्टमनच्या हलगर्जीपणाची चौकशी करून पोस्टमन विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!