ताज्या बातम्याधार्मिकनांदेड

श्री देवदेवेश्वर मंदिरात पंचावतार उपहार व संतपूजन सोहळा संपन्न.

श्रीक्षेत्र माहूर

महानुभाव पंथीयांचे महास्थान असलेल्या देवदेवेश्वर संस्थानच्या दत्तमंदिराच्या प्रांगणात जगतगुरू विश्वविधाता श्री दत्तात्रेय प्रभू यांच्या असीम कृपेने दि. 4 ऑक्टो. रोजी पंचावतार उपहार व संतपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.या सोहळ्याचे आयोजन सदभक्त अमोघ कपाटे यांनी केले होते.                                                             श्री देवदेवेश्वर संस्थानच्या दत्त मंदिरात प. पु. प. म. मधुकरबाबा कवीश्वर,कवीश्वर कुलाचार्य प.पु.खामणीकर बाबा, प. पु. विद्वान्स बाबा,प. पु. कापूसतळणीकर बाबा, प. पु. साळकर बाबा, प. पु. न्यायंबास बाबा, प. पु. पाचराऊत बाबा, प. पु. गोपीराज बाबा, प. पु. लाड बाबा,प. पु.मुधोव्यास बाबा, एकोबास बाबा या विद्वत संत महंतांच्या उपस्थितीत स. 7-30 वा. श्री दत्तात्रेय कवच पारायणाचे पठण,9 वा. देवास मंगलस्नान व महाअभिषेक, दु. 12 वा. विडा अवसर समर्पण व पंचावतार उपहार हा विधी संपन्न झाला.दु. 1 वा.प. पु. प. म. मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांच्या अध्यक्षतेत संतपूजन सोहळा पार पडला. त्यानंतर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्याला 300 ते 350 संत मंडळीची उपस्थिती लाभली. सोहळ्याचे औचित्य साधून सुरेश आराध्ये यांनी साकारलेल्या रांगोळीचे संत महंत मंडळीने कौतुक करून त्यांना आशीर्वाद दिला.सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी योगीराज बापू विद्वान्स, मुरामल्ले व्यास शास्त्री यांनी परिश्रम घेतले.सोहळ्याला उपस्थिती दर्शविल्या बद्दल आयोजक सदभक्त अमोघ कपाटे यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!