
माहूर- राज्याचे लोकप्रिय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे वाढदिवसानिमित्त माहूर तालुका तेली समाज संघटने कडू नश्री रेणुका माता माहूर गड येथे अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त श्री रेणुका मातेला अभिषेक महाआरती नैवेध दाखवून दीर्घायुष्याची कामना करण्यात आली नंतर ग्रामीण रुग्णालय माहुर येथे रुग्णांना फळांचे वाटप करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलेनगर माहूर येथे विद्यार्थ्यांना कंपास पेन वही अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तेली समाज संघटनेचे पदाधिकारी नागोराव सुर्वे, निलेश वाघमारे, कांतराव घोडेकर, प्रभाकर क्षीरसागर, पंकज क्षीरसागर, आदीसह अनेकांची सहकुटुंब उपस्थिती होती, तसेच युवा वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.

