
नायगाव : नागेश कल्याण
नायगाव विधानसभा निवडणूक काळात उद्योजक मारोतराव कवळे गुरुजींच्या गावात मावंदे जेवणास जावून त्यांच्या उद्योगाचे वभोडे काढणाऱ्या पूनम पवार व आ. राजेश पवार यांनी एम . व्ही. के. अँग्रो कुसुमनगर – वाघलवाडा साखर कारखान्याच्या साखर पूजन सोहळ्यास उपस्थिती लावून गुरुजींच्या उद्योगास भरभराटीच्या शुभेच्छा देत त्यांच्या उद्योग भरभराटीचे कौतुक केले. यामुळे पवार दाम्पत्याच्या या करामतीची चर्चा राजकीय वर्तुळात चागलीच चर्चेत आली आहे.
इंग्रजी मध्ये म्हण आहे. ‘ All is fair love and politics’ याची प्रचीती राजकारणात नवी नसली तरी एखाद्याचा पोटतिडकीने राजकीय द्वेष करून त्याच्या जीवन कृतृत्वाच्या मर्मावर बोट ठेवत गावभर आरडाओरडा व धिंडोरा पिटणाऱ्या पूनम पवार यांना गुरुजींच्या कारखान्यातील साखर अचानक एवढी गोड कशी काय लागू लागली याचे कोडे सामन्याच्या चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळं राजकारणात असणारी माणसं व्यासपीठावर कधी कोणाला कुठल्या पातळीवर कोणत्या विषयावर काय बोलतील याचा नेम नाही. यामुळे त्यांचे असे बोलणे सामान्य नागरिकांनी कितपत मनावर घ्यावीत असा प्रश्न सर्व सामन्याना न उलगडणारच असो वैयक्तिगत कार्य कृतृत्व असेल तर आपणास भले बुरे म्हणणारी, उच्च पातळीवर टिका टिप्पणी करणारी व्यक्ती कितीही मोठी व कुठल्या ही पदावर असू द्या त्या व्यक्तीस ही आपल्या कार्यापुढे कसे झुकावे लागते याची प्रचीती मात्र कवळे गुरुजी यांनी आपल्या औद्योगिक नित्य कर्मातून दाखवून दिले हे मात्र नक्की

