
नायगाव :
नायगाव पोलीस स्टेशन व कुंटूर पोलिस स्टेशन या दोन्ही पोलिस ठाण्याचे वतीने लोहपुरुष लोकनेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने एकता दौडचे आयोजन करून महापुरुषांना मान वंदना देण्यात आली. नायगाव शहरात शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता तर कुंटुर येथे सकाळी ठीक ७.०० वाजता लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती अनुषंगाने *RUN FOR UNITY* (एकता दौड) चे आयोजन नायगाव पोलिस ठाणे व कुंटूर पोलिस ठाणे या दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी करण्यात आले होते. नायगाव येथे पोलिस ठाणे प्रमुख पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. जी. पोमनाळकर व पोलिस उपनिरीक्षक गजानन सोटेवाड यांच्या नियोजनाखाली करण्यात आले होते. सदर एकता दौड ही शहरातील डॉ हेडगेवार चौक ते लालवंडी रोड दरम्यान करून सदर कार्यक्रमाची सांगता कृषी महाविद्यालय नायगाव येथे करण्यात आले. तर कुंटूर पोलिस स्टेशन च्या वतीने सपोनी विशाल भोसले यांचे मार्गदर्शन व नियोजनाखाली कुंटूर राष्ट्रीय एकता दौड कुंटूर बसस्टँड ते लोकडेश्वर मंदिर वरून परत जीनिंग दरम्यान करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रीय एकता दौड ला परिसरातील नागरीक, पत्रकार बांधव, विद्यार्थी, पोलीस भरती व आर्मी भरती सराव करणारे युवक, युवती, विद्यार्थी कर्मचारी वर्गाने सस्वंयस्फूर्त आपला सहभाग संख्येने नोंदवून राष्ट्रीय अखंडता व एकता दाखवून दिली याबद्दल दोन्ही ठाण्याचे ठाणे प्रमुख यांच्यावतीने या एकता दौड मधील सहभाग बद्दल आभार मानण्यात आले

