
कुंटुर : अनिल कांबळे
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील चार स्वतंत्र सैनिक मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या लढ्यामध्ये यशस्वी सहभाग घेतला होता. हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात प्रत्येक घटकांचा समावेश होता भारताला स्वातंत्र मिळवण्यासाठी मराठवाडा आणि तेलंगणा आज भारत त्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा आणि तेलंगणा निजामाच्या राजवटीत होते. निजाम हा जनतेवर अत्याचार करत होता हा अन्याय असाहय होत होता . त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील युवकांनी पुढाकार घेत निजामची सत्ता उलथवून टाकण्यासाठी शपथ घेतली होती . त्यासाठी सैनिक कॅम्प उभारण्यात आले होते . या सर्व स्वतंत्र सैनिकांना हत्यारांची गरज भागविण्यासाठी पैशाची आवश्यकता होती, त्यामुळे उमरी येथील हैदराबाद निजाम सरकारची आर्थिक नाडी असलेली स्टेट बँक हैद्राबाद लुटण्याचा सर्व स्वतंत्र सैनिकांनी शपथ घेतली ,दत्ताजी उत्तरवार यांची रजाकाराने करणे हत्या केली गोविंद पानसरे यांची हत्या केली त्यामुळे स्वतंत्र सैनिकाचे पित्त खवळले त्यांनी या घटनेचा बदला, प्रति शोध घेण्यासाठी उमरी बँक लुटण्याची व निजाम सरकारची आर्थिक नाडी तोडण्याचे शपथ घेतली . पहिला हल्ला उमरी रेल्वे स्थानकावर तर दुसरा हल्ला उमरी पोलीस ठाणकावर आणि तिसरा हल्ला उमरी बँकेवर करण्याची योजना आखण्यात आली रेल्वे स्थानकावर हल्ला करण्यापूर्वी रेल्वे पटरी उघडण्यात आली तिन्ही तुकड्यांना त्यांना दिलेल्या ठिकाणी पोहोचण्या सांगितले. सर्व सैनिक कामाला लागल्या होत्या सर्वात पहिले कुंटूरकर गटानी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या टीमने रेल्वे पटरी उडवुन रेल्वे स्थानकावर हल्ला केला आणि रेल्वे स्थानक ताब्यात घेतले त्यानंतर त्यांनी पोलीस स्थानक परिसरात दबा धरून बसलेल्या टीमला हात गोळा फेकून काम फत्ते झाल्याचा इशारा दिला . हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढयायधे कुंटुर येथील चार विराचाचा सहभाग होता. 17 सप्टेंबर 1948 पासून हा सुरुवात झाली या दिवशी स्वतंत्र मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती व प्राणाची बाजी लावणाऱ्या स्वतंत्र वीरांना मात्र स्वतंत्र्याची एक आशा होती त्याच्यासाठी त्यांनी आपल्या जिवाचे रानही केले . यामध्ये विठ्ठल नागोराव भोसले , तर लक्ष्मण चिंताके , लक्ष्मण झुंजारे, बाबुराव कुंटूरकर यांनी मात्र आपल्या जीवाचे रान करून स्वतंत्र सैनिक याचा साथ देऊन हैदराबाद निजाम सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणाची ही भाजी लावली हे चारही मर्द कुंटूर येथील रहिवासी होते कुंटूर च्या या स्वतंत्र सैनिकाच्या 75 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम निमित्ताने शतशत नमन. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिनामध्ये खारीचा वाटा असल्याचेही अनेक पुरावे आहेत. त्यातील उमरी बँक लुटण्याच्या ह्या पहिला प्रयत्नामध्ये पहिले काम रेल्वेपटरी उडवण्याचा काम कुंटुरकर गटाकडे देण्यात आला होता व ते यशस्वी पूर्ण करून आपल्या साथीदारांना साथ दिली व या वीरांना आज 17 सप्टेंबर दिनानिमित्त कुंटूर परिसरातील सर्व नागरिक व त्यांचे नातेवाईक तसेच त्यांचे सर्व मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या या लढ्यातील वीरांना नमन करत आहेत . या स्वतंत्र सैनिकाच्या कामगिरी बजावली यांची सर्व माहिती कुंटुर येथील शेख खमरोदिन पाशामिया, नारायण कोंडीबा जुनिकर यांनी सांगितले आहे.

