ताज्या बातम्यानांदेडनायगाव

मांजरम मधील गावकऱ्यांनी पुन्हा एकदा जोपासली सामाजिक बांधिलकी…

नायगाव : नागेश कल्याण

मागील महिन्यात 26 सप्टेंबर 2025 रोजी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा केलेला उद्घाटन सोहळा आणि प्रशासनाला दिलेली लोकशाही चपराक हा विषय चांगलाच जिल्हाभर चर्चेत आला होता.                                                              आज प्रथमच या आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे गावकऱ्यांनी शिबिरातील सर्व माता-भगिनींना फळांच्या किटचे वाटप करून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जोपासली.    यावेळी विनायकराव पाटील शिंदे, दिगांबर पा.शिंदे, व्यंकटराव केते,डॉ.राजकुमार पोहरे साहेब, विठ्ठलराव शेटेवाड,राजेश पा.शिंदे,रघुनाथ पा.शिंदे,विशाल पा. शिंदे,श्रीपत पा.शिंदे,श्रीकांत पा.शिंदे,भास्कर पा. गायकवाड, विलास पा.शिंदे,ओम पा.गायकवाड,निळकंठ मंगनाळे, धम्मानंद जोंधळे,धीरज शिंदे,मुबीन शेख,बालाजी पा.शिंदे,संजय पा.शिंदे, निलेश शिंदे या सर्वांच्या हस्ते रुग्ण माता-भगिनींना केळी, सफरचंद,बिस्किट अशा सकस आहाराचे किट वाटप करण्यात आले.यावेळी रुग्णांचे नातेवाईक व दवाखान्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!