नायगाव : शंकर अडकिने
नायगाव ते कुंटूर उमरी हा रस्ता बनवण्यासाठी अंदाजे 200 कोटी रुपयांच्या रस्ते बांधण्यासाठी निधी असल्याचे समजते 25 26 किलोमीटर ला 200 कोटी रुपयांचा निधी असून एवढे पैसे असतानाही येथील गुत्तेदाराची मनमानी प्रमाणे काम चालू असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित काम राज सेतू या कंत्राटदारामार्फत सुरू असून, प्रत्यक्ष पाहणीत काही ठिकाणी जुने पूल तडकलेले तसेच रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नव्याने बांधण्यात येणाऱ्या रस्त्याची जाडी आणि मजबुती अपेक्षित निकषांनुसार नसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी पूल व रस्त्याच्या कडेला भेगा पडल्याचेही निदर्शनास आले आहे. इतक्या मोठ्या निधीच्या प्रकल्पात गुणवत्तेबाबत तडजोड होत असल्यास संबंधित विभागाने तातडीने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

