गुन्हेगारीताज्या बातम्यानांदेडनायगाव

मोरइकळीत धाडसी चोरी दिड लाख रोख नगदी १० तोळे सोने व चांदीचा ऐवज अज्ञात चोरट्याने केला लंपास.

कुंटूर पोलिसांसमोर चोरट्याना शोधण्याचे मोठे आव्हान!.

 

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या मोरईकळी येथे दिनांक ३० मे २०२५ रोजीच्या रात्री अंदाजे १ ते दिड वाजताच्या दरम्यान दाराच्या खिळ्याला लटकावून ठेवलेल्या चावीने कुलूप काडून अज्ञात चोरट्याने १० तोळे, दागिने व नगदी १ लाख पन्नास हजार रुपये चोरट्याने लंपास केले असल्याने गावात हळहळ व्यक्त केले जात आहे, सदर प्रकरणी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी स्वान पथक गावात हजर झाले असून अज्ञात व्यक्ती विरोधात कुंटूर पोलीस ठाण्यात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सविस्तर वृत्त असे की, नायगाव तालुक्यातील कुंटूर ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ईकळीमोर येथिल एकत्रित कुटुंब असलेल्या शेतकरी विजय विनायक मोरे यांनी यांच्या भावाच्या मुलींच्या लग्नासाठी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पाईपाई पैसे जमा करून जमेल त्या रकमेतून सोने व चांदी खरेदी करून कपाटात ठेवलेले दहा तोळे सोने, चांदी महिलांचे दागिने व नगदी १ लाख पन्नास हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे.परिणामी एकीकडे शेती सात देत नाही,त्यातच घरातील अंदाजे जवजळ चौदा लाखाचा ऐवज लंपास केल्याने सदर कुटुंबावर अन्यायाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

घराचे कुलुप काडून चोरटे घरात प्रवेश करून विजय विनायक मोरे यांच्या घरातील लोखंडी कपाटाचा व लॉकरचा कुलुप तोडुन नगदी १ लाख पन्नास हाजर रुपये व सोन्याचे व चांदीचे दागिने ज्याची अंदाजे १२ लाख पन्नास रुपयांचा ऐवज लंपास केली असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर प्रकरणातील अज्ञात चोरट्याना कुंटूर पोलीस शोध घेऊन अटक करतील का याकडे कुंटूर परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

         सदर प्रकरणाची कुंटूर पोलिसांना माहिती मिळताच राहेर बिटचे जमादार निकम व पोकॉ.बारहाळे त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील माहिती घेऊन सदरची माहिती वरिष्ठ अधिकारी यांना कळविले असल्याने घटनास्थळी स्वनाच्या आधारे पुरावे शोधण्याचे काम सुरू होते. त्यात अनेक वास्तूचे फिंगर प्रिंट नमुने घेणार असले तरी सदर घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्या चोरट्याना अटक करण्याचे मोठे आव्हान कुंटूर पोलिसां समोर उभे टाकले आहे.                          घडलेल्या घटनेबद्दल गावातील जेष्ठ व्यंकटराव शामराव पा.मोरे व  प्रकाश लक्ष्मणराव वडजे  यांच्यासह गावकऱ्यातून हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!