ताज्या बातम्यानांदेड

कृषी विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी”.; कार्यकारी परिषदेचे सदस्य भागवत देवसरकर यांचा अभिनव उपक्रम

माहूर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून “विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी” हा 2 दिवसाचा अभिनव उपक्रम शुक्रवार दि.1ऑगस्ट ते शनिवार दि.2 ऑगस्ट रोजी हदगाव तालुक्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य भागवत देवसरकर यांनी दिली आहे.

या उपक्रमात कृषी विद्यापीठाचे शिक्षण विभागाचे संचालक तथा अधिष्ठाता डॉ.भगवान आसेवार,विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल रामटेके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय कळसाईत, केळी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ.शिवाजीराव शिंदे कीटकशास्त्रज्ञ डॉ.बी व्ही भेदे,हवामान विभागाचे कृषी विस्तारतज्ञ डॉ. वसंत सूर्यवंशी कृषी विज्ञान केंद्राची शास्त्रज्ञ डॉ.माणिक कल्याणकर,तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील आदी मान्यवर सहभागी होणार आहेत,शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन विविध पिकावर झालेल्या किड व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तज्ञ अधिकारी हळद कापूस सोयाबीन तूर ऊस या पिकांच्या कीड रोग व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती देणार आहेत.

शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा.वडगाव बुद्रुक, कोळगाव,कंजारा, शिवनी, वाळकी बाजार, धानोरा टाकळा व वाळकी बुद्रुक मोठी या गावात भेटी देणार आहेत,शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी उमरी जहागीर वायफना बुद्रुक,येवली,पिंपळगाव राजवाडी गवतवाडी तळ्याचीवाडी घोगरी, चिकाळा ब्रम्हवाडी या गावात शेतावर जाऊन पिकाची पाहणी करून शास्त्रज्ञ,अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत, शेतकरी बांधवांनी या उपक्रमात सहभागी होऊन शास्त्रज्ञ व अधिकार्‍याकडून आपल्या पिकाच्या कीड व रोगाविषयी व उत्पादन वाढीसाठी माहिती घ्यावी व जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन कार्यकारी परिषद सदस्य भागवत देवसरकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!