नायगांव / प्रतिनिधी
नायगांव तालुक्यातील गडगा येथील विद्यमान शिवसेना विधानसभा प्रमुख तथा विधानसभा समन्वयक शिवाजीराव नागोराव पन्नासे यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नायगांव प्रभारी तालुका प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
शिवाजीराव नागोराव पन्नासे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. ते महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकनिष्ठ म्हणून ते जिल्हाभरात ओळखले जातात. त्यांचा पक्षवाढीसाठी उत्साह, कामाची पद्धत व विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. पन्नासे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष वाढीसाठी कमी वेळात दोन हजार सदस्य नोंदणी केली आहे.
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेला अधिक मजबूत करत संघटनात्मक करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या कामांचा उत्साह पाहून हिंदुहुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्यांचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना उपनेते तथा कॅबिनेट मंत्री दर्जाचे आमदार हेमंत पाटील यांच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यांच्या हस्ते शिवाजीराव नागोराव पन्नासे यांची शिवसेना पक्षाच्या नायगांव प्रभारी तालुका प्रमुख पदी नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख ओमप्रकाश पाटील धुप्पेकर, सचिन पाटील टाकळीकर, शेख जब्बार नरसीकर सह आदींची उपस्थिती होती.

