ताज्या बातम्यानांदेडनायगाव

गडग्यात महावितरणाचा भोंगळ कारभार , एक महिन्यापासून डिपी बंद

जनावरानाची पाण्यासाठी भटकती: महावितरणाचे दुर्लक्ष

नायगाव / प्रतिनिधि एल बी रानडे

नायगाव तालुक्यातील मांजरम ३३ के.व्ही. अतंर्गत येत असलेल्या गडगा येथील मांजरम रोड शेजारी असलेला डिपी गेल्या एक महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
डिपी बंद असल्याने जनावराना पाण्यासाठी वनवन भटकती करावी लागत.यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही वरिष्ठाकडून दखल घेतली जात नाही.महावितरणचे सहाय्यक अभियंता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित फोन उचलत नसल्याने शेतकऱ्यामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तीव्र पाणी टचाई असून.अनेक बोर बंद विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तीन चार किलोमीटर पायपीठ करून जनावरानाची ताहान भागवावी लागत आहे.मात्र महावितरणच्या अधिकार्यांना जाग येत नाही.दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत असताना संबधित वरिष्ठ अधिकारी सुद्धा दखल घेत नाहीत.या बाबींमुळे शेतकऱ्यामध्ये नाराजी व्यक्त केली जात असून.ता गंभीर मुद्‌द्‌याकडे जिल्ह्याधिकाऱ्यांनी लक्ष देऊन विधुत पुरवठा सुरळीत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!