
नायगाव : बाळासाहेब पांडे
श्री शंकराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलंबी येथील२००१ दहावी बॅच च्या विद्यार्थ्यांनी दोन तप पार पडल्या नंतर तब्बल २४वर्षा नी हॉटेल सिटी प्राइड नांदेड येथे मैत्रीचा अनोखा सोहळा नुकताच घेतला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ शिक्षक तथा साहित्यिक पी.बी.वाघमारे सर प्रमुख पाहुणे वाय. एफ आदमनकर सर, जे. एस.शिंदे सर, ए.एच.बामणे सर,एन.आर.पांडे सर , एस एन.रामशेठवाड सर ,विशेष निमंत्रित शाळेचे माजी विद्यार्थी डॉ विभूतवार यांची उपस्थिती या वेळी होती.सर्व प्रमुख अतिथी विद्यार्थी, यांनी आपले मनोगत व अनुभव कथन व्यक्त केले.शेवटी पी.बी.वाघमारे सर यांच्या सविस्तर अश्या अध्यक्षीय समारोपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गीतांजली पाटील यांनी तर कार्यक्रमाचे संचालन मोहम्मद शेख सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार गोविंद मोरे यांनी मानले… एक शिक्षक झालेला विद्यार्थी मोहम्मद शेख सर यांनी आपल्या गुरु बद्दल कृतज्ञता म्हणून स्वतःची गुरुराया कविता सादर केली… त्या कवितेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले… यावेळी तीस ते चाळीस वर्गमित्र उपस्थित होते…


