ताज्या बातम्यानांदेडनायगाव

महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची गरज. डॉ विरूपाक्ष शिवाचार्य महाराज.

नायगाव बाजार येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी.

नायगाव
महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे चालण्याची गरज आज आहे. सध्या महापुरुषांची जयंती डोक्यावर घेऊन साजरी केली जात आहे, परंतु आजची गरज लक्षात घेतली तर त्यांचे विचार डोक्यात घेणे गरजेचे आहे.बाराव्या शतकात अनिष्ट रूढी परंपरे विरूद्ध बंड करून एक निष्ठ भक्तीचा मार्ग दाखविणारे ते एक महापुरुष होते असे प्रबोधन ष.ब्र डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांनी नायगाव शहरात आयोजित केलेल्या महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त बोलताना केले.
नायगाव बाजार येथील गांधी नगर येथे जगत् ज्योती माहत्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गुरूवर्य विरूपाक्ष शिवाचार्य म्हणाले सध्याची जीवनशैली गतीमान झाली आहे.सध्याच्या काळात महापुरूषांच्या जयंत्या साजरा केल्या जात आहे. परंतु आचार विचाराची देवाणघेवाण होत नाही.परंतु आज नायगाव शहरात साजरी होत असलेली जयंती एक आदर्श जयंती आहे.प्रबोधन,शिवपाठ, प्रसाद आणि भजनाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करून एक वेगळा संदेश दिला आहे .
प्रथमतः महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन गुरूवर्य विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.भजनी मंडळाच्या माध्यमातून अभंग, वचने गाऊन गुरूवर्याच्या अमृत उपदेशाने कार्यक्रम सुरु झाला . यावेळी ताराबाई बोमनाळे, बापुराव बोमनाळे, विकास भुरे,विश्वनाथ बोमनाळे,खुशालराव तुपदाळे, नम्रता कोरनुळे, लक्ष्मीबाई तुपदाळे, उमेश महाराज कुंभारगावकर, काशीनाथ स्वामी,शिवा महाराज स्वामी,रामकीशन अप्पा, निळकंठ हांडे, शिवराज नागठाणे,सांभय्या स्वामी, ज्ञानेश्वर महाराज, गंगाधर स्वामी, भिमाशंकर माधव सुपारे, संभाजी हांडे, शिवराज बेटमोगरेकर आदी मंडळी उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!