ताज्या बातम्यानांदेडनायगावशेती

शेतकऱ्यांनी डी.ए.पी. खताचा आग्रह धरू नये !.

दिपेश देवरे तालुका कृषी अधिकारी नायगाव .

नायगांव तालुका परीसरातील शेतकऱ्यांनी डीएपी या खताचा आग्रह न धरता डीएपी ऐवजी पर्यायी खतांचा वापर करावा जसे, की सिंगल सुपर फॉस्फेट व युरिया. सिंगल सुपर फॉस्फेट या खताच्या तीन बॅगा व युरिया खताची अर्धी बॅग याचे मिश्रण करून वापरल्यास आपला उत्पादन खर्च कमी होईल व तेलबिया (सोयाबीन ) पिकास आवश्यक असलेले सल्फर हे सुद्धा सिंगल सुपर फॉस्फेट या खतातून पीकास मिळत आसल्यामुळे तेलाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल असे प्रतिपादन तालुका कृषिअधिकारी दिपेश देवरे यांनी केले.
त्याचबरोबर पेरणी करीत असताना घाई न करता उगवण क्षमता तपासावी नंतरच पेरणी करावी असे सांगून शेतकऱ्यांना खते, बियाणे या संदर्भात काही तक्रार असल्यास तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्षात व तालुकास्तरीय गुणवत्ता नियंत्रण भरारी पथकास संपर्क साधावा त्यासाठी तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रावरती तालुकास्तरीय गुणवत्ता नियंत्रण भरारी पथकाच्या संपर्क क्रमांकाचे नाम फलक लावण्यात आले आसल्याची माहीती पंचायत समिती सभागृहात आयोजीत कार्यशाळेत बोलतांना दिली .

  • Related Articles

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Back to top button
    error: Content is protected !!