ताज्या बातम्यानांदेडनायगाव

नायगाव तालुक्यात ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षण सोडत जाहीर.

80 पैकी 41 गावात महिलाराज.

नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पडली. ही प्रक्रिया नायगाव तहसील कार्यालयात मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.80 पैकी 41गावात महिला राज

या सोडत कार्यक्रमास माननीय उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे मॅडम, तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड मॅडम, निवडणूक विभागाचे तहसीलदार श्री. सतीश कुलकर्णी, नायब तहसीलदार श्री. विजय एरवाड, गटविकास अधिकारी श्री. मिरजकर (नायगाव पंचायत समिती), उपविभागीय कार्यालय बिलोली येथील अव्वल कारकून आलमवाड, महसूल सहाय्यक हंबर्डे व निवडणुकीचे ऑपरेटर साईनाथ भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

आरक्षण सोडत अत्यंत पारदर्शक आणि संगणकीकृत पद्धतीने घेण्यात आली. विविध आरक्षित प्रवर्गांनुसार सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. कार्यक्रमात कोणताही अनुशासनभंग न होता, उपस्थित ग्रामस्थांनी शांततेने सहभाग नोंदवला.

या आरक्षण प्रक्रियेमुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला दिशा मिळाली असून, आगामी काळात निवडणुका अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतील, अशी माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली.

    आरक्षण निहाय सुटलेली गावे अशी

अनु. जाती

तलबिड, राजनगर, कोठाळा, पिंपळगाव, मुस्तापूर, गोदमगाव, सोमठाणा, खंडगाव (अ.जाती महिला) मुगाव / मुगाव तांडा, कहाळा बु., वंजरवाडी, चारवाडी, टाकळी त.ब., मरवाळी तांडा, खैरगाव, निळेगव्हाण व धुप्पा.

अनु जमाती

अनु. जमाती मरवाळी-कोपरा व रातोळी, महिला -होटाळा व रुई खु.

 

इतर मागासवर्गीय –

कारला त. मा., माहेगाव, कुंटूर, टाकळी बु., दरेगाव, बळेगाव, इकळीमाळ, सांगवी, इज्जतगाव बु, डोंगरगाव व मनूर.

महिला -ईकळीमोर, शेळगाव छत्री, हिप्परगा जा, पळसगाव- टाकळगाव, सुजलेगाव, बरबडा, राहेर व नरसी. मेळगाव, सावरखेड, केदारवडगाव.

 

सर्वसाधारण…

टाकळी त. मा, धानोरा त. मा. सातेगाव, घुंगराळा, परडवाडी, कहाळा खु, सालेगाव, कांडाळा, हंगरगा, लालवंडी, कोकलेगाव, कोलंबी, गडगा, पाटोदा, कुष्णूर, मांजरम, मोकासदरा, ताकबिड, बेटकबिलोली.

महिला – नरंगल, मांडणी, धनंज, हुस्सा, आलुवडगाव, शेळगाव गौरी, भोपाळा, रुई बु., देगाव, औराळा, गोळेगाव नायगाव वाडी, कुंचेली, टेंभुर्णी, अंतरगाव, बेंद्री, अंचोली, रानसुगाव वजिरगाव, नावंदी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!