
श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने
गेल्या वर्षभरापासून माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या हप्त्याच्या रकमेसाठी होत असलेल्या वेगवेगळ्या आंदोलनाला नगरपंचायत कडून बगल देण्यात येत असल्याने दि 19 पासून सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला शहरातील घरकुल लाभार्थ्यातून वाढता पाठिंबा मिळत असल्याने उद्या दिनांक 22 रोजी नगरपंचायत च्या निषेधार्थ अर्धा दिवस माहूर शहर बंद चे आयोजन करण्यात आले आहे
माहूर शहरात आतापर्यंत 1337 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून सहाशे पेक्षा जास्त घरकुल पूर्ण झाली आहेत तरीही एकाही घरकुलाची पूर्ण रक्कम मिळालेली नसल्याने गेल्या वर्षभरापासून घरकुल लाभार्थी रकमेसाठी नगरपंचायत चे उंबरठे झीजवत आहेत तरीही मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी वेळ काढू धोरण अवलंबिल्याने लाभार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अनेक मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांनी निवेदने देऊन आंदोलने करून काहीच फरक पडला नसल्याने टोकाचे पाऊल उचलत आकाश कांबळे यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आज या उपोषणाचा चौथा दिवस असून नगरपंचायतकडून या विषयी वेळ काढू धोरणाचे उत्तर देऊन समाधान करण्याचा प्रयत्न होत असल्याने उपोषणार्थीसह लाभार्थी संतप्त झाले आहेत
उपोषणास बसलेले आकाश कांबळे यांच्या मागण्यांच्या समर्थनात सर्व घरकुल लाभार्थ्यांनी तहसीलदार अभिजीत जगताप पोलीस निरीक्षक देविदास चोपडे प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार अभिजीत जगताप यांच्याकडे निवेदन देऊन मागण्या मान्य न केल्यास दि 22 रोजी माहूर शहर अर्धा दिवस बंद ठेवण्याचे निवेदन दिले असून या निवेदनावर रणधीर पाटील राजू सौंदलकर विक्रम राठोड यांचे सह शेकडो लाभार्थ्यांच्या स्वाक्षर्या आहेत

