
नायगाव
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांची १४२ वी जयंती आ.भा.ब्राह्मण महासंघ नायगाव शाखेच्या वतीने बुधवारी सायंकाळी कुलस्वामिनी इलेक्ट्रिक दुकान येथे साजरी करण्यात आली.या वेळी ब्रह्म मित्र भा. ग.मोरे,धनराज शिरोळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानीआ.भा.ब्राह्मण महासंघ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे हे होते.
या वेळी युवाअध्यक्ष प्रज्योत कुलकर्णी, तालुका सल्लागार श्याम कुलकर्णी, सुधीर जोशी कापसिकर,ॲड राजेश कुलकर्णी,रोहन जोशी ,ब्रह्मि मीत्र मारोती पाटील जीगळेकरयांची उपस्थिती होती.ब्रह्म मित्र भा. ग मोरे बाळासाहेब पांडे यांनी सावरकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.प्रास्ताविक श्याम कुलकर्णी यांनी तर संचलन ॲड राजेश कुलकर्णी यांनी तर आभार प्रज्योत कुलकर्णी यांनी मानले.


