
नायगाव गजानन चौधरी
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोणीही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने दुसऱ्या टप्प्यातील ऑनलाइन सर्वे करण्यासाठी जिल्हा तालुका व गाव पातळीवर संबंधित ग्रामपंचायत नगरपंचायत सूचना देऊन ऑनलाईन सर्वे करण्याचे निर्देश जारी केले असल्याने या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी लालवंडी येथील ग्रामसेवक संदीप पा.मोरे देगावकर हे प्रत्येक वार्डातील कुटुंबाचा डोर टू डोअर जाऊन पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल योजने पासून कोणीही वंचित राहू नये म्हणून स्वतः जातीने लक्ष घालून ऑनलाईन सर्वे करत आहेत.
ग्रामीण भागातील सामान्य जनतेला पक्के व हक्काचे घर असले पाहिजे यासाठी शासनाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र व गरजू अशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना शासनाकडून कोणीही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी नायगाव विधानसभेचे कार्यसम्राट आ.राजेश पवार यांनी मतदार संघात जास्ती जास्त घरकुलचे ऑनलाईन सर्वेक्षण झाले पाहीजे यासाठी प्रयत्नशिल आहेत.व आ.पवार यांनी ग्रामसेवकांना बक्षीस ही जाहीर केले आहेत.
नायगाव तालुक्यातील ग्रामसेवक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे आदेश पाळून ग्रामसेवक सकाळी सहा वाजताच गावात पोहचत आहेत. लालवंडी येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संदीप पा.मोरे व सेवक दत्ता कोंडावाड हे मात्र ही योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे आणि या योजनेचा लाभ पात्र व गरजू लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे हा दूरदृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून गावातील डोर भेट देऊन पात्र व गरजू लाभार्थ्यांचे सर्वे करत असल्याने पात्र व गरजू लाभार्थींना निश्चितच या योजनेचा लाभ मिळेल असा विश्वास गावकऱ्यांना आला आहे.

