ताज्या बातम्यानांदेडनायगाव

डोंगरगाव येथील दिव्यांग लाभार्थ्यांचे पाच वर्षापासून पाच टक्के निधी चे पैसे थकले ग्रामपंचायत 5% चा निधी रोखल्याने उपोषण करण्याची दिव्यांग व्यक्तीवर आली वेळ.

कुंटूर :

नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे डोंगरगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत दरवर्षी अपंग विधवा निराधार लोकांना पाच टक्के निधी मार्फत साहित्य व त्यांना उपयोगी साहित्य वस्तू व अनुदान देण्यात येते. मात्र हे सदर अनुदान 2021 पासून 2025 आज पर्यंत देण्यात आले नसल्याने डोंगरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते देवराव नारे यांनी ग्रामपंचायतीच्या समोर उपोषणास बसले आहे. डोंगरगाव येथील गावातील दिव्यांग, विधवा निराधार लोकांच्या सामाजिक प्रश्न असलेल्या अनुदानाचा प्रश्न ग्रामपंचायतीने आजपर्यंत सोडू शकले नाही त्यामुळे त्यांना वेळोवेळी लेखी पत्र देऊनही दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य तसेच अनुदान वाटप केले नसल्याने देवराव नारे या सामाजिक कार्यकर्ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष नांदेड यांचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी आजपर्यंत काम पाहिले असून त्यांनी या गरीब होतकरू तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या हक्कासाठी ग्रामपंचायत च्या समोर दिव्यांग लाभार्थ्यासमवेत उपोषणास बसले आहे. ग्रामपंचायत समोर आज दिनांक 16 सप्टेंबर सकाळी दहा वाजता पासून उपोषण सुरू झाले आहे. उपोषण बसण्याच्या काळातही त्यांना सदर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी कोणीही भेट दिली नाही. ग्रामपंचायतच्या वसुलीतून पाच टक्के दिव्यांगाना निधी वाटप करत असतो मोजे डोंगरगाव ग्रामपंचायत ची साडेसहा लाख रुपये 2021 ते 25 पर्यंत वसुली जमा झालेली असून त्या निधीचा ग्रामसेवक सुर्यवंशी व सरपंचांनी बट्ट्याबोळ केला आहे. अशी माहिती यावेळी देवराव नारे सामाजिक कार्यकर्ते यांनी केले आहे. लवकरच अनुदान देईल की नाही याची साश्वती उरले नाही अशी यावेळी माहिती मिळाली आहे. दिव्यांग लाभार्थ्याने दिली असून भर पावसामध्ये दिव्यांग लाभार्थ्याचे उपोषण सुरू आहे. याकडे ग्रामपंचायतीचे साप दुर्लक्ष व प्रशासन व पोलीस प्रशासन सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याची माहिती देवराव नारे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!