ताज्या बातम्यानांदेडनायगाव

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सदस्य नोंदणी चा खतगावकर यांच्या उपस्थितीत रविवारी नरसित शुभारंभ .

नायगाव
राज्याचे माजी मंत्री तथा मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नायगाव विधानसभा मतदार संघातील नायगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ नरसी येथे करण्यात आला.
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार राज्यात राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी होत असून त्या अनुषंगाने देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघात पंचवीस हजार सभासद नोंदणी अंतिम टप्प्यात आली असून नायगाव विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी होईल आणि मराठवाड्यात नांदेड जिल्हा राष्ट्रवादी सदस्य नोंदणीत नंबर एक वर राहील असा विश्वास खतगावकर साहेब यांनी व्यक्त केला.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करणार आणि राष्ट्रवादीचाच झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकित फडकणार आणि आपली राहिलेली विकास कामे आपण करून घेऊ असाही विश्वास खतगावकर साहेब यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार अविनाश घाटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विक्रम देशमुख तळेगावकर,माजी सभापती अशोक पाटील मुगावकर,बिलोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आनंदराव बिराजदार गुरुजी,गणपत पाटील धूपेकर,राजू गंदीगुडे,भास्कर पा.भिलवंडे,विश्वनाथ बडूरे,माजी सभापती शिवाजी पाटील जाधव,सुरेश पाटील खंडगावकर,यादव भिलोंडे,माधव लव्हाळे,सुधाकर कोकणे,सौ.महानंदा गायकवाड,रावसाहेब पाटील शिंदे,नागनाथ आप्पा स्वामी,उत्तम गवाले,राजू पाटील,सुरेश पाटील मुगाव,सय्यद खलील,सुरेश पाटील शेळगाव,माधव कोरे,पांडुरंग बागडे,बालाजी इरेवाड, ध्न्यानेश्वर सूर्यवंशी,इंजी.श्याम पाटील शिंदे,प्रा.वानखेडे,बाबू पाटील मोरे,मधुकर पाटील शिंदे,हणमंत कदम,संजय नेर्लेवाड,गोविंद पाटील जाधव,बालाजी मुस्तापूरकर, ,रणजीत पाटील मोरे यांच्यासह परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!