
जयकुमार अडकिने
माहूरगड येथे ऋषीपंचमीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी उसळली होती. मात्र, दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसासह विजेच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर हादरला.
पावसाचा जोर इतका प्रचंड होता की गर्दीत आलेल्या भाविकांची चांगलीच ताराबंडी उडाली. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी खालच्या बाजूस कोणतेही आश्रयस्थान नसल्याने उपस्थितांना जीव मुठीत घेऊन शेरावर पळापळ करावी लागली. अनेक महिला, लहान मुले व वृद्ध भाविक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
दरम्यान, स्कायवॉकच्या कामात सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले तीन (लोह-पाईपचे तात्पुरते स्ट्रक्चर) मुसळधार पावसासोबत आलेल्या वाऱ्यामुळे कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे भाविकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. गडावर जाणाऱ्या रस्त्यावर अनेक झाडे उन्हाळून पडले असल्यामुळे वाहनधारकांसाठी ही एक झोखीमच होती.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पावसाळ्यात विशेष व्यवस्था करणे आवश्यक असल्याची मागणी आता पुढे येत आहे.

