ताज्या बातम्यानांदेडनायगाव

कुंटूर पोलिसांची अवैध देशी दारू व शिंदी विक्री करणाऱ्यावर दोघांवर कारवाई.

कुंटुर : सिद्धार्थ गजभारे

नायगाव तालुक्यातील कुंटूर बसस्टॉप वर गेल्या अनेक दिवसांपासून अवैध देशी विदेशी दारू विक्री व शिंदी विक्री केली जात होती.दिनांक १३ मार्च रोजी शिंदी व देशी विक्री करणाऱ्या दुकानावर कुंटूर पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. ही कारवाई कुंटूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल डी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अवैध दारू विक्री व शिंदी विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कारामुंगे , हेड कॉन्स्टेबल खंदारे , कॉन्स्टेबल स्वप्नील हंबर्डे व कॉन्स्टेबल पल्लेवाड यांनी संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकून दोघांना मुद्देमालासह पकडण्यात आले.

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात शिंदीचे भरलेले पोते(५५ पॉकेट) देशी दारू च्या १८ बॉटल असा साठा जप्त करण्यात आला असून दोघांना  ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी त्यांना पोलीस स्टेशन कुंटूर येथे नेण्यात आले. संबंधितां विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65 (ई), अन्वये अवैध देशी दारूची, शिंदी विक्री व साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे कुंटूर परिसरात अवैध दारू करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे दिसत आहे.या कारवाई मुळे दारू विक्रेत्यामध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!