नायगाव : बाळासाहेब पांडे
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे ११ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘शेतकऱ्यांचा हंबरडा मोर्चा’ यशस्वी करण्यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये तयारीला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मंगळवारी दुपारी १ वाजता नरसी येथील शासकीय विश्रामगृहात नायगाव विधानसभा पातळीवरील विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मा. बबनराव थोरात साहेब (संर्पकप्रमुख, नांदेड), मा. ज्योतीबा दादा खराटे (जिल्हाप्रमुख, नांदेड), मा. गणेश गिरी (उपजिल्हाप्रमुख, नांदेड), मा. राजेश लंगडापुरे (विधानसभाप्रमुख, नायगाव), मा. रामचंद्र रेड्डी (उपजिल्हासंघटक, नांदेड) आणि मा. बालाजी माली पाटील (विधानसभा उपसंघटक, नायगाव) यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे. बैठकीदरम्यान ‘हंबरडा मोर्चा’ यशस्वी करण्यासाठी नायगाव विधानसभा पातळीवरील नियोजन, संघटनात्मक जबाबदाऱ्या, कार्यकर्त्यांची उपस्थिती तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. शिवसेना पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या न्याय्य लढ्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीस शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, तालुकासंघटक, तालुकासंयोजक, उपतालुकाप्रमुख, सर्कलप्रमुख, उपसर्कलप्रमुख, शाखाप्रमुख तसेच आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नायगाव विधानसभा संघटनेकडून करण्यात आले आहे. शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक जोमातून आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा हंबरडा मोर्चा ऐतिहासिक ठरणार, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.

