
नायगाव –
अंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त नायगाव येथील दत्त शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना एकाच मैदानावर घेऊन योगा करण्यात आल्या.योग हे मानवाच्या जीवनात अंत्यंत महत्वाची साधना आहे केवळ 21जून रोजीच योगा करून चालत नाही त्याच्यात सातत्य असावे यानिमित्ताने उपस्थित क्रीडा शिक्षकांना आदेश देऊन पुढच्या वर्षी प्रत्येक शाखेतील विद्यार्थी योग शिक्षक म्हणून समोर यावेत अशी अपेक्षा योग दिनाच्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष शिवराज पाटील होटळकर यांनी केली.
21 जून रोजी मेलीनिअम इंग्लिश स्कूलच्या मौदानात संस्थेचे अध्यक्ष शिवराज पाटील होटळकर व योग शिक्षक विनायक कोंडावार,सौ.रीतीशा कोंडावार, प्राचार्य के.बी .फाजगे, पत्रकार विकास भुरे, पल्लवी वडजे, केंद्र प्रमुख साधू सर , एकनाथ कल्याण, रघुनाथ सुर्यवंशी सुनंदा पांडे ,रूपेश पवार ,आनंद पवार,यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती मातेचे पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .
यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सहज हासत खेळत योगाचे धडे योग शिक्षक विनायक कोंडावार,सौ.रीतीशा कोंडावार यांनी दिले.यावेळी शिवराज पाटील होटळकर यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणाले आज संपूर्ण जग योग करीत आहे.आपणही योग करता मात्र शरीर निरोगी राहण्यासाठी योग सातत्याने करावे असे आवाहन केले.या कार्यक्रमात यमुनाबाई प्रथामिक, माध्यमिक , ज्युनिअर काॅलेज, दत्त प्रथामिक, माध्यमिक, ज्युनिअर कॉलेज,व मेलीनिअम इंग्लिश स्कूल आदी शाळाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.या दिनाचे औचित्य साधून शाळेच्या प्रांगणात एक पेड मा के नाम या उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


