ताज्या बातम्यानांदेड

संत सेवालाल महाराज यांच्या धार्मिक ध्वजाचे संरक्षण करा ! .

अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडणार गोर सेनेचे पोलीस प्रशासनास निवेदन .

जयकुमार अडकिने

माहूर – केरोळी फाटा ता. माहूर येथील संत सेवालाल महाराज यांच्या धार्मिक ध्वजाची वारंवार विटंबना करणाऱ्या इसमा विरुद्ध योग्य ती कारवाई करून बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पांढऱ्या ध्वजाचे संरक्षण करा अन्यथा तीव्र जन आंदोलन उभारणार असल्याचा इशारा गोर सेना तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव यांनी पोलीस निरीक्षक माहूर यांना सादर केलेल्या निवेदनात दिला आहे. माहूर तीर्थक्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या केरोळी फाटा येथे रुई हडसनी जाणाऱ्या रोड लगत माळरान जमिनीवर गेल्या शेकडो वर्षापासून बंजारा समाजाचे श्रध्दास्थान असलेले संत सेवालाल महाराज यांचा पांढरा ध्वज आहे. परंतु जाणीव पूर्वक वारंवार बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेला पांढरा ध्वज काढून फेकून देत काही इसम धार्मिक भावना दुखावत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. केरोळी फाटा ता. माहूर येथील संत सेवालाल महाराज यांच्या धार्मिक ध्वजाची वारंवार विटंबना करणाऱ्या इसमा विरुद्ध योग्य ती कारवाई करून त्यांना कायदेशीर समज देऊन पाबंद करण्यात यावे व बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पांढऱ्या ध्वजाचे संरक्षण करण्यात यावे अन्यथा गोर सेनेच्या वतीने व संत सेवालाल महाराज भक्तांच्या वतीने तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी गणेश राठोड, यादव आडे, प्रल्हाद राठोड, कृष्णा राठोड, प्रल्हाद कारभारी, विठ्ठल राठोड, देवानंद भांडवले अदिसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!