नायगाव तालुक्यातील गडगा येथे सोमवारी (ता.२८) रोजी महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न अण्णा साठे महात्मा फुले यांच्यासह विविध महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण सकाळी नऊ वाजता माजी नगरसेवक राहूल लोंहूबदे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पन्नासे हे होते.तरी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार रियाज शेख,प्रा.सावतकर,प्रा.बी.एन.गोईनवाड ,कांबळे भोलेनाथ सोनकांबळे हे होते.
यावेळी संभाजी गोईनवाड,गोविंद जोंधळे, बाबुराव रानडे, राहूल जोंधळे,गौतम जोंधळे, माधव जोंधळे, किरण गायकवाड,प्रकाश जोंधळे,राजेश गोईनवाड,रावसाहेब रानडे,बालाजी रानडे, संजय गोईनवाड, दिंगाबर रानडे, गणेश भांगे आम्रतराव रानडे पुंडलिकराव रानडे नागोराव गोईनवाड, पिराजी गोईनवाड राधाबाई जोंधळे, लक्ष्मीबाई जोंधळे यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सेवानिवृत शिक्षक के.एन.कांबळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन एल.बी.रानडे यांनी मानले.

