
नायगाव:: बाळासाहेब पांडे:
नायगाव येथील अंबिका मंगल कार्यालयात नायगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कुंटूर, बरबडा, मांजरम व नरसी सर्कल येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब प्रमुख उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी भूषविले. स्वर्गीय खासदार वसंतराव पाटील चव्हाण साहेबांच्या दुःखद निधनानंतर ही कार्यकर्त्यांची पहिली निवडणूक असल्याचे सांगत खासदार रवींद्र चव्हाण यांनी भावनिक शब्दांत कार्यकर्त्यांना प्रेरित केले. ते म्हणाले की,“या निवडणुकीत आपण सर्वांनी एकजुटीने, ताकदीनिशी आणि प्रामाणिकपणे लढा देणे गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी योग्य उमेदवारांची निवड करून सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांनाही न्याय मिळेल, याची काळजी काँग्रेस पक्ष नेहमी घेत आला आहे आणि पुढेही घेईल. सामान्य कार्यकर्त्याला विजयश्री मिळवून देणे — हेच स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
बैठकीदरम्यान स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बळकटी, निवडणूक तयारी व जनसंपर्काच्या धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय आप्पा बेळगे यांनी केले. या कार्यक्रमाला शमीम अब्दुल्ला (माजी उपमहापौर), माधव आप्पा बेळगे (माजी जि.प. सदस्य), संजय पाटील शेळगावकर (माजी उपसभापती प.स. नायगाव), हनुमंतराव पाटील चव्हाण (माजी सदस्य प.स. नायगाव), श्रीनिवास पाटील चव्हाण (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव), विजय पाटील चव्हाण (उपनगराध्यक्ष न.प. नायगाव), सय्यद रहीम शेठ (माजी सभापती), बालाजी पाटील टेंभुर्णीकर (माजी सदस्य), संजय चोंडे (ओबीसी तालुका अध्यक्ष), रवींद्र भालेराव (नगरसेवक नायगाव), सुरज शिंदे (जिल्हाध्यक्ष एनएसयूआय) तसेच जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत

